त्या जागे संदर्भात पुरावे सादर करा तहसिलदारांचे आदेश
बसपाच्या निवेदनाची दखल घेण्यात आली.
बुलढाणा जिल्हा संपादक राजेंद्र डोईफोडे.
चिखली:- तालूक्यातील अंत्री खेडेकर येथिल बौद्ध समाज बांधवांनी गावाला लागून असलेल्या सरकारी ई क्लास जमिनीवर अतिक्रमण करुण लोखंडी बोर्ड लावला होता मात्र अज्ञात समाज कंटक लोकांनी तो उपटून तोडून टाकल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या घटनेची बातमी प्रसारमाध्यमामध्ये प्रकाशित होताच खळबळ उडाली असता तात्काळ तहसीलदार येळे यांनी दखल घेवून बौध्द समाज बांधवांना जागे संदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश दिले. अंत्रीखेडेकर येथील सरकारी ईकास गट न १६ मध्ये ३७ आर हेक्टर पडित जमीन आहे. ही जमीन गावाला लागून असल्याने गावातील अनेक धनाढ्य लोकांनी एकमेकांमध्ये चढाओढ करुण प्रत्येकाने चार ते पाच एकर प्रमाणे जमिनीवर अतिक्रमण करुण टाकले आहे. तसेच गावातील बौध्द समाजाच्या लोकांनी सुध्दा गेल्या सहा वर्षांपासून या जमिनीवर अतिक्रमण करुण पंचशील ध्वज आणि पंचशील बहुउद्देशीय भजनी मंडळ नोंदणी १० / २२ असा बोर्ड लावून बौद्ध समाजाची नियोजित जागा असा लोखंडी बोर्ड उभारण्यात आला होता अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत मात्र १० मार्च च्या रात्रीला एका अज्ञात समाज कंटक व्यक्तीने समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने बौद्ध समाजाने लावलेला लोखंडी बोर्ड उपटून टाकला त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची बातमी दै देशोन्नती व ईतर प्रसार माध्यमामध्ये प्रकाशित करण्यात आली बातमी प्रकाशित झाल्याने अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला होता त्यामध्ये बसपा महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे विधानसभा अध्यक्ष किशोर गवई बसपा नेते गंगाधर गवई, पंचशील मंडळाचे अध्यक्ष बबन मोरे, सचिव समाधान मोरे, कोषाध्यक्ष बच्छलाबाई उत्तम मोरे, सदस्य यशोदा बाई मोरे, मंदाबाई मोरे यांनी निवेदन दिले त्यामुळे तहसीलदार अजितकुमार येळे यांनी तात्काळ दखल घेवून बौद्ध समाजबांधवांनी जागे संदर्भात पुरावे सादर करावे असे लेखी आदेश काढले आहे.
