महा ऑनलाईन केंद्रा वाटपामध्ये दिव्यांगणा प्राधान्य देण्यात यावे प्रहार अपंग क्रांती खामगाव तालुका अध्यक्ष किशोर मा होकार यांची मागणी. जिल्हाधिकारी यांना निवेदन.

 महाऑनलाईन केंद्रा वाटपामध्ये दिव्यांगांना प्राधान्य देण्यात यावे प्रहार अपंग क्रांती खामगाव तालुका अध्यक्ष किशोर मा होकार यांची मागणी;जिल्हाधिकारी यांना निवेदन . अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मो.८२६२०८७८६६,

खामगाव तालुक्यात दिव्यांगांचे प्रमाण जास्त असून दिव्यांग हा समाजातील अतिशय दुर्लब व दुर्लक्षित घटक असून दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी व स्वावलंबनासाठी आपले सरकार सेवा केंद्र अर्थात महा ऑनलाईन केंद्र सेतू केंद्र यामध्ये दिव्यांगांना प्राधान्यक्रमाने घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रहार अपंग क्रांती खामगाव तालुका अध्यक्ष किशोर मा होकार यांनी मा जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की आपले सरकार सेवा केंद्र अर्थात महाऑनलाईन केंद्र सेतू केंद्र यामध्ये दिव्यांगांच्या अर्जाचा विचार करून दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी संधी द्यावी खामगाव तालुक्यात रिक्त जागांवर दिव्यांग व्यक्तींच्या अर्जांचा विचार करावा काही दिव्यांग व्यक्ती महाऑनलाईन केंद्र ऑपरेटरच्या माध्यमातून सुद्धा चालू शकतात त्याकरता त्यांची निवड करून सदर महाऑनलाईन केंद्रामध्ये दिव्यांगांना प्राधान्य देण्यात यावे व रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी किशोर मा होकार यांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler