पिंप्री आंधळे गावात सरपंचाच्या पुढाकाराने दारूविक्री झाली बंद, महिलांचा मोर्चा, ठाणेदारांनी दिले कारवाईचे आदेश.
निवेदन देताना सौ. अंजली अर्जुन आंधळे सरपंच पिंपरी आंधळे
बुलढाणा संपादक राजेंद्र डोईफोडे. देऊळगाव राजा:- तालुक्यातील पिंप्री आंधळे गावात अवैधरीत्या देशी दारु विक्रीचे प्रमाण वाढल्याने व्यसनाधीन लोकांच्या उपद्रवामुळे गावकरी त्रस्त झाले होते, अखेर सरपंच अंजली अर्जुन आंधळे यांनी पुढाकार घेऊन गावातील दारूची विक्री कायमची बंद ठेवण्याचा निर्धार करुन महिलांसोबत पोलीस स्टेशन गाठले, ठाणेदार गणेश हिवरकर यांनी तात्काळ अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. पिंप्री आंधळे ग्रामपंचायत क्षेत्रात अवैधरित्या देशी दारु विक्रीचे प्रमाण वाढले होते, यामुळे व्यसनाधीन लोकांबरोबर तरुण मुलेही व्यसनाच्या आहारी जाऊ लागले, घरोघरी रोजची भांडणे, गावातील चौकाचौकात बेवड्यांचा धुमाकूळ यामुळे महिलासह नागरिक त्रस्त झाले होते, प्राथमिक शाळा, व विद्यालयाच्या परिसरात दारू विकणाऱ्यांचे ठिकाण असल्याने विद्यार्थी व शिक्षकही दररोजच्या त्रासाला कंटाळले होते, याची जाणीव ठेऊन सरपंच अंजली आंधळे यांनी ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन सोमवार पासून गावात कायमची दारूबंदी करण्याचा निर्धार करत शनिवारी सकाळी दारू विकणाऱ्यांना इशारा दिला होता, रविवारला सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिला नागरिक जमा झाल्यानंतर सरपंच अंजली अर्जुन आंधळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा अंढेरा पोलीस स्टेशनवर धडकला, सरपंच अंजली आंधळे, सदस्या आशा साळवे, सरला साळवे, लक्ष्मीबाई आंधळे, शिल्पा आंधळे, अनिताबाई साळवे यांनी ठाणेदार गणेश हिवरकर यांच्याशी चर्चा करतांना अवैध दारु विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली, यावर ठाणेदार गणेश हिवरकर यांनी पीएसआय वासाडे व बिट जमादार गजानन वाघ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले, पीएसआय वासाडे यांना सरपंच अंजली अर्जुन आंधळे व महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले, यावेळी पोलीस स्टेशन मध्ये गावातील महिलांसह पत्रकार अर्जुन आंधळे,पो.पा.भगवान आंधळे, तंटा मुक्ती अध्यक्ष विष्णू आंधळे, सदस्य कल्याणसिंग परिहार, प्रभाकर आंधळे, सुभाष साळवे, विकास साळवे, राजु गुमलाडू, विकास आंधळे, शुभम आंधळे, नरेश आंधळे, विष्णु आंधळे, संदीप जायभाये, अर्जुन बाबा आंधळे, हजर होते. ( *सरपंच पदाचा प्रभार घेतल्यापासून गावात अवैध दारू विक्रीचा प्रश्न ऐरणीवर होता, अनेक कुटुंबाची शांतता हरवली. तरुण मुलांचे संसार धोक्यात आले, म्हणुन गावातली दारू बंद करण्याचा निर्णय घेतला, कोणत्याही परिस्थतीमध्ये गावात दारू विक्री होणारच नाही, या निर्णयावर आम्ही ठाम आहोत, सौ. अंजली अर्जुन आंधळे सरपंच ग्रामपंचायत, पिंप्री आंधळे*)