वरोरा तालुका काँग्रेस च्या पर्यावरण विभाग अध्यक्ष पदी संदीप दडमल तर उपाध्यक्ष पदी उज्वला ताई थेरे यांची निवड
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
चंद्रपूर:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत पर्यावरण विभागाच्या वरोरा तालुका अध्यक्ष पदी संदीप दडमल तर उपाध्यक्ष पदी उज्वला ताई थेरे यांची निवड करण्यात आली.
नियुक्ती पत्र त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक व पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय पाटील तसेच पर्यावरण विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष स्वाती घोटकर आणी शहर अध्यक्ष ताज कुरेशी यांच्या हस्ते देण्यात आले.
संदीप दडमल हे ग्रामपचायत परसोडा खैरगावं चे सरपंच आहे पक्षीय कार्यासोबत ते समाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असल्याने कांग्रेस पक्ष बळकटीसाठी व पर्यावरण विभागातर्फे पर्यावरण सवर्धनाचे काम ते प्रभाविपणे पार पाडतील हा विस्वास ठेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली या नियुक्ती बाबत चंद्रपूर- आर्णी निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर वरोर- भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे आमदार सो. प्रतिभा ताई धानोरकर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मिलिंद भोयर तालुका काँग्रेस कमिटी चे महिला अध्यक्ष सो. रत्नाताई अहिरकर कृ.बा.स चे सभापती राजूभाऊ चिकटे . प.स.चे सभापती रवींद्रजी धोपटे ग्रा.प.बोर्डा चे सरपंच येश्वर्या खामणकर पुरुषोत्तम पावडे प्रफुल आसुटकर आणी इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले