रानटी डुकराच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे 8928860058
चंद्रपूर :- नेरी वरून जवळ असलेल्या खातोडा येथील सुखदेव बारेकर नामक कामगार रोजगार हमी च्या गोंदेडा येथील कामावर सकाळी सायकलने निघाले वाटेत रस्त्यावर रानटी डुकराने त्यांच्या सायकलीवर हल्ला चढविला यात डुकराच्या सायकलला दिलेल्या जोरदार धडकेने सायकलस्वार खाली पडले आणि गंभीर जखमी झाले यात त्यांच्या पायाला दुखापत झाली
गोंदेडा गट ग्रा प अंतर्गत खातोडा हे गाव येत असून येथील सुखदेव बारेकर वय ६५ वर्ष हे रोजगार हमी योजनेच्या कामाला खातोडा येथून सायकलने गोदेडाकडे येतं असताना रानटी डुकराने सायकलवर हल्ला केला यात सुखदेव बारेकर यांना उजव्या मांडीला गंभीर दुखापत झाली सदर घटनेची माहिती मिळताच रोजगार हमी च्या कामावरील मजुरांनी धावून जात मदत केली व त्याच्यावर उपचार करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे भरती करण्यात आले प्रकृती चिंताजनक व गंभीर असल्याने ब्रम्हपुरी येते रेफर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली