एसबीआय बँकेत विड्रॉलद्वारे पैसे देणे बंद!निराधारांना अडचण शिवसंग्राम चे बँक व्यवस्थपकांना निवेदन

 एसबीआय बँकेत विड्रॉलद्वारे पैसे देणे बंद!निराधारांना अडचण


शिवसंग्राम चे बँक व्यवस्थपकांना निवेदन





संतोष वासुंबे/देऊळगांवराजा:

येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये विड्रॉल भरून ग्राहकांना पैसे देणे बंद केले आहे. ग्राहकांना एटीएम कार्ड नुसार पैसे भरणे काढणे ट्रान्सफर करणे ग्रीन सिग्नल काउंटर द्वारेच करावे लागत असल्याने निराधारांना दर महा मिळणारे वेतन काढण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे निराधार नागरीक व जे ग्राहक डिजिटल व्यवहार करण्यास असमर्थ आहे अशांना या नियमातून सूट देऊन विड्रॉल दारे पैसे देण्यात यावे,अशी मागणी शिवसंग्राम संघटनेने शाखा व्यवस्थापक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

    शिवसंग्राम ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देऊळगाव राजा शहरातील भारतीय स्टेट बँक शाखेमध्ये विड्रॉलद्वारे पैसे देणे बंद केले आहे.सर्व ग्राहकांना एटीएम द्वारे व बँक ग्राहक केंद्रातून व्यवहार करण्यात यावे असे बँकेकडून सांगितल्या जात आहे.मात्र असुशिक्षित व ज्यांच्याकडे एटीएम कार्ड नाही आशा बँक ग्राहकांना व्यवहार करणयास मोठी अडचण निर्माण झाली आहे.तसेच बँकेने विड्रॉल द्वारे पैसे देणे बंद केल्यामुळे निराधार व्यक्तींना दरमहा मिळणारे शासकीय वेतन काढण्यासाठी अडचणीचे ठरत आहे.निराधार नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करणे शक्य नाही पैसे काढण्यासाठी ग्राहक केंद्रावर जाऊन कमिशन द्यावे लागते. शिवाय अनेक निराधार व्यक्तींचे अंगठ्याचे ठसे व्यवस्थित येत नसल्याने त्यांना ऑनलाईन व्यवहार करता येत नाही.ग्रीन चैनल काउंटर या नियमामुळे गरीब व निराधार व्यक्तींना व्यवहार करण्यास अडचण निर्माण होत आहे.यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. याबाबत शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जाऊन शाखा व्यवस्थापकांशी सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. व निराधार नागरिक तसेच जे बँक ग्राहक ऑनलाइन व्यवहार करण्यास असमर्थ आहे, अशा ग्राहकांना यानियमातून सूट देऊन त्यांना विद्रोलद्वारे पैसे द्यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे राजेश इंगळे,जहीर पठाण,अजमत खान, शेख राजू,शेख असिफ,संतोष हिवाळे आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler