पीएसआय गणेश बुवा यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदयाने कारवाई करा
लोकशाहि मराठी पत्रकार संघ बुलाडाणाची मागणी
राजेंद्र डोईफोडे बुलढाणा जिल्हा संपादक
चिखली-: लोकशाही मराठी पत्रकार संघ, जळगाव जिल्हयातील धरणगाव तालुका अध्यक्ष मा. महेंद्र चौधरी यांना धरणगाव पो.स्टे. चे सहाय्यक उपनिरीक्षक गणेश बुवा यांनी कोणतेहि संयुक्तीक कारण नसतांना जबर मारहाण केल्या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कायदेशिर कारवाई करणे बाबत महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी बुलडाणा यांना तहसिलदार चिखली व पोलीस निरीक्षक, चिखली यांच्या मार्फत देण्यात आले.
निवेदनात नमुद लोकशाही मराठी पत्रकार संघ, जळगाव जिल्हयातील धरणगाव तालुका अध्यक्ष मा. महेंद्र चौधरी यांना धरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक गणेश बुवा यांनी कोणतेहि संयुक्तीककारण नसतांना जबरमारहाण केल्या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कायदेशिर कारवाई यावी तसेच वैध धंदयांच्या बातमी प्रकाशीत केल्याचा राग मनामधे ठेऊन महेंद्र चौधरी यांना कोणत्याही प्रकारची विचारपुस न करता धरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक गणेश बुवा यांनी जबर मारहाण केल्याने सर्व पत्रकार बांधामध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कायदेशिर कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मराठी पत्रकार संघ बुलडाणा जिल्हयाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात असा ईशारा सुध्दा देण्यात आला आहे या निवेदनाच्या प्रतीलीपी
पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस आयुक्त अमरावती, पालकमंत्री बुलडाणा जिल्हा, पालकमंत्री जळगाव जिल्हा, लोकशाहि मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष सचिन बोंबले, प्रदेश उपाध्यक्ष अमोल पाटिल, मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा विदर्भ प्रभारी दशरथ सुरडकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक वाघ, जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक सावळे यांना देण्यात आले आहे. यावेळी लोकशाहि मराठी पत्रकार संघ बुलडाणा जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे, चिखली तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र घुबे, संपर्क प्रमुख राधेशाम काळे, तालुका अध्यक्ष शेख अजहर, उपाध्यक्ष कु. वंदना गवई, सचिव रवी मगर, संघटक निलेश कोल्हे, सहसंघटक राजीव जाधव, कोषाध्यक्ष समाधान वानखडे, समन्वयक कु. मेघा जाधव, सदस्य सिध्दार्थ वानखडे, बुलडाणा तालुका अध्यक्ष प्रकाश जेऊघाले हे उपस्थीत होते.
