भूमिअभिलेख कार्यालयाची मोजणी शेतकऱ्यांनाना अमान्य

 भूमिअभिलेख कार्यालयाची  मोजणी शेतकऱ्यांनाना अमान्य



6 वेळा मोजणी करूनही प्रत्येक वेळी सीमांकनात बदल , शेतकऱ्यांत मोजनी बदल संशय 


न्याय न मिळाल्यास शेतकऱ्यांचा ग्रा प समोर आत्मदहनाचा इशारा


प्रतिनिधी नेरी-प्रवीन वाघे,


चिमूर तालुक्यातील नेरी येथील स्मशानभूमी मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असून या स्मशानभूमीची हद कायम व्हावी या करिता तब्बल 6 वेळा मोजणी करण्यात आली मात्र प्रत्येक मोजणीच्या फरक येत असल्याने दि 20 एप्रिलला करण्यात आलेली 6 वी मोजणी ही सुद्धा संशयास्पद असून सीमांकन बाबत शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला असून शेतकऱ्यांना अमान्य आहे तेव्हा शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ग्रा प समोर शेतकरी आत्मदहन करणार असा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे

               सविस्तर वृत्त असे की नेरी येथील स्मशानभूमी च्या जागेबाबत समस्या निर्माण झाली असून या जागेवर अतिक्रमण झाले असून दर पाच वर्षांनी या जागेची मोजणी करण्यात येत आहे परंतु जागेची समस्या कायम आहे त्यामुळे या वर्षी भूमिअभिलेख कार्यालया तर्फे तब्बल 6 वेळा मोजणी केली असता हद कायम झाली नाही आणि शेतकरी वर्गाला ही हद मान्य नाही भूमी अभिलेखकार्यालयाच्याअधिकाऱ्यांच्या  मोजणीबाबत शेतकऱ्यांना आता संशय निर्माण झाला आहे ही 6 वि मोजणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असून त्यांची भरपूर प्रमाणात जागेवर अतिक्रमण दाखवीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची 90 वर्षे पासून  वडिलोपार्जित जागा कुठे आहे किंवा जमीन गायब झाली का असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे ही मोजणी शेतकरी वर्गाला अमान्य असून कुणाच्या तरी दबावाखाली ही सीमांकान केल्या जात आहे असा आरोप शेतकरिवर्गाने केले आहे आणि न्याय मिळाला नाही तर ग्रा प समोर सामूहिक आत्मदहन करू असा इशारा शेतकरी वर्गाने दिले आहे

          मागील तत्कालीन सरपंच रामदास सहारे यांनी 5 वर्षाअगोदर भूमिअभिलेख कार्यालया अंतर्गत मोजणी केली असता संपूर्ण जागेची सीमांकान होऊन हद कायम करण्यात आली होती त्या मोजणीला शेतकरी वर्गणी संमती दिली होती आणि जागेचा प्रश्न सुटला होता परंतु नव्याने निवडून आलेल्या सदस्य नी पुन्हा मोजणी करून वाद निर्माण केला आहे आणि प्रत्येक वेळेस मोजणी करताना सीमांकानात फेरबदल होत असल्याने मोजणी अधिकारी यांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होत आहे स्मशानभूमीची खरी जागा न मोजता शेतकऱ्यांच्या जागेत अतिक्रमण दाखवीत असल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली असून शेतकरी वर्गाला ही मोजणी मान्य नाही तेव्हा सदर मोजणी बाबत शेतकरी वर्ग हे आमदार  पालकमंत्री शेतकऱ्यांचे कैवारी राज्यमंत्री बचू कडू मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांना निवेदन देणार आहेत तसेच जर न्याय मिळाला नाही तर ग्रा प समोर आत्मदहन करू असा इशारा शेतकरी अरुण मोतीराम बुडे बबलू कुरेशी जावेद कुरेशी मुबारक कुरेशी माणिक बुडे अशोक बुडे गुलाब बुडे नथु राखडे बापूराव बुडे यांनी शेतात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler