शिवसेनेचे महावितरण कार्यालयाला निवेदन

 शिवसेनेचे महावितरण कार्यालयाला निवेदन 




मुन्ना ठाकूर विशेष प्रतिनिधी बुलढाणा जिल्हा


देऊळगाव राजा शहर तसेच ग्रामीण भागात  नवीन मीटर कनेक्शन तसेच मीटर बिघाड सदोष असलेले मीटर बदलून द्या.

 शिवसेनेचे युवा नेते लालचंद डोंगरे यांची मागणी

                          आज शिवसेनेचे च्या वतीने सहायक अभियंता महावितरण कार्यालय देऊळगाव राजा यांना शिवसेनेचा वतीने निवेदन देण्यात आले 

निवेदनात नमूद आहे की देऊळगाव राजा शहरामध्ये नवीन वीज कनेक्शन अर्ज व योग्य ते शुल्क भरल्यानंतर ग्राहकाला कमाल 1 महिन्याचा आत विद्युत जोडणी सुरू करून देणे विद्युत वितरण कंपनीची जबाबदारी असताना  नवीन वीज कनेक्शन चे योग्य ते शुल्क भरल्यानंतरही 5 ते 6 महिने उलटल्यानंतर ही  ग्राहकाला वारंवार चकरा एकाच कामासाठी माराव्या लागतात जुने मीटर वेगाने फिरत असल्यास किंवा त्यात काही बिघाड आहे असे आढळल्यास सदर मीटर विद्युत वितरण कंपनीकडून योग्य ते चाचणी शुल्क भरून तपासून घेण्याचा अधिकार असताना जर सदोष व खराब असल्याचे आढळले तर चाचणी शुल्क परत देने तसेच नवीन मीटर बसवून देने ही विद्युत कंपनीचे जबाबदारी असताना देखील जुन्या मिटर कनेक्शन धारकांना ही महावितरण उडवाउडवीची उत्तर देत आहे त्यामुळे ग्राहकांना आर्थिक आणि  मानसिक त्रास सहन कारावा लागत आहे यातून ग्राहकांना महावितरण कार्यालयाचे  डीसाळ नियोजन दिसत आहे. निवेदन देताना शिवसेनेचे युवा नेते लालचंद डोंगरे, किशोर जामदार,मोहन खांडेभराड,हनुमान बैरागी लक्ष्मीकांत बुलबुले,राहुल भावसार, आदी शिवसैनिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler