दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन कडून दिव्यांग रितेश तायडे यास सायकल देऊन दिला मदतीचा हात
मलकापूर:- दिव्यांग
उपसंपादक संदीप म्हस्के 9637066118
बांधवांच्या सेवाकार्यात नेहमी मदतकार्य करणारे दिव्यांग मल्टिपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळु चोपडे यांच्या फाउंडेशन सेवा कार्यातून इच्छापूर ता.बऱ्हाणपूर(M. P) येथील दिव्यांग रितेश अनिल तायडे या लहान मुलाला दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून घरपोच दिव्यांग सायकल देण्यात आली.या दिव्यांग मुलाला शाळेत पायी चालत जाणे शक्य नसल्याने त्यांचे हाल होऊ नये, यासाठी निलेश बाळु चोपडे यांच्याकडून दिव्यांग सायकल देण्यात आल्याने दिव्यांग व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.व वडील नसल्यामुळे आई एक वर्षांपासून विधवा असून मजुरी करून पालन पोषण करते तरी इतर सरकारी योजने पासून वंचित आहे इच्छापुरातील अधिकारी,सामाजिक संस्था,दिव्यांग संस्था, या सर्वांनी यांच्या कडे लक्ष देण्यात यावे व घरकुल योजना, विधवा पेशन योजना अपंग पेन्शन योजना, तरी इच्छापूरातील नागरिकांनी या विषयी लक्ष देऊन मदत करावी.
जेणेकरून असे लोक वंचित राहणार नाही.
