नागरी समस्यांवर राष्ट्रवादीच्या वतीने मुख्याधीकारी यांना घेराव
मेघा जाधव शहर प्रतिनिधी चिखली
चिखली :- राष्ट्रवादीच्या वतीने मुख्याधिकारी यांना धारेवर धरण्यात आले तसेच नागरी समस्यांना जसे चिखली येथिल नागरीकांनि शहर अध्यक्ष रविंद्र तोडकर यांना आपल्या समस्या सांगीतल्या जसे पंधरा दिवसातुन नळाला पाणी येणे तेही पिवळे पाणी येत असल्यामुळे बिमारीचे प्रमाण वाढत आहे. तसेच वाढलेल्या डासांमुळे शहरात फवारणी संदर्भात चर्चा, शहरातील गुंठेवारीचे प्रकरणे हे होत नसल्याच्या तक्रारी बाबत चर्चा व ईतर शहरातील जनसामान्यांचे प्रश्नासह मुख्याधिकारी यांना धारेवर धरण्यात आले यावेळी नामदार पालकमंत्री डाॅ राजेंद्र शिंगणे यांचे स्वीय सहाय्यक संतोष लोखंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिखली शहराध्यक्ष रवींद्र तोडकर शहर उपाध्यक्ष सदानंद मोरगंजे नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे युवक राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर बोंद्रे विधानसभा सरचिटणीस प्रशांतभैय्या डोंगरदिवे महिला प्रतिनिधी सौ रत्नाताई सोळंकी आशा कस्तुरे हे उपस्थीत होते.
