ब्रेकिंग : राज ठाकरे यांच्या ताफ्याला नगरमध्ये मोठा अपघात, दिग्दर्शक-अभिनेत्याच्या गाडीचं मोठं नुकसान..

 ब्रेकिंग : राज ठाकरे यांच्या ताफ्याला नगरमध्ये मोठा अपघात, दिग्दर्शक-अभिनेत्याच्या गाडीचं मोठं नुकसान..


राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा मोठा अपघात झाला आहे.. राज ठाकरे यांच्या ताफ्यात मागे असणाऱ्या तीन गाड्या एकमेकांना जोरात धडकल्या.. अहमदनगरहून औरंगाबादला जाताना घोडेगावजवळ आज (ता. 30) दुपारी हा अपघात झाला..


दरम्यान, या अपघातात मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीच्या बोनटचं मोठं नुकसान झालंय. या अपघाताबद्दल सविस्तर माहिती मिळू शकली नाही.


नेमकं काय घडलं..?

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे राेजी (रविवारी) औरंगाबादेत राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यासाठी आज सकाळी ते पुण्याहून नगरमार्गे औरंगाबादसाठी जात होते. तत्पूर्वी 100 पुरोहितांच्या हाताने पूजापाठ करण्यात आला. वढू येथे राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं..


नंतर राज ठाकरेे यांचा ताफा औरंगाबादकडे निघाला.. प्रवासादरम्यान राज ठाकरे यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. नगरमध्ये राज ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफा येताच, मनसे कार्यकर्त्यांनी प्रमुख चौकात भोंग्यावरुन ‘हनुमान चालिसा’ म्हटली.. राज ठाकरे यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली..


नगरमध्ये थोडा वेळ थांबून नंतर हा ताफा पुढे औरंगाबादसाठी निघाला.. मात्र, नेवासे तालुक्यातील घोडेगावजवळ राज ठाकरे यांच्या मागे असणाऱ्या तीन गाड्या एकमेकांवर जोरात आदळल्या.. त्यात केदार शिंदे, अंकुश चौधरी यांच्या गाड्यांचं मोठं नुकसान झालं.. अपघातानंतर हा ताफा पुन्हा औरंगाबादच्या दिशेनं मार्गस्थ झाला.


दरम्यान, राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरुन महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. त्यामुळे सुरुवातीला राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी औरंगाबादेतील सभेसाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, पण दोन दिवसांपूर्वी काही अटी-शर्थी घालून या सभेला परवानगी देण्यात आली. आता उद्याच्या (ता. 1 मे) ते काय बोलतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे..

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler