खा. संभाजीराजे भोसले व आ. संजय गायकवाड यांची रायगडावर भेट ,
आ. गायकवाड यांनी दिले बुलढाणा येण्याचे आमंत्रण ;
अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मो.८२६२०८७८६६,
बुलढाणा
येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड व खासदार संभाजीराजे भोसले यांची रायगडावर स्नेह भेट झाली. यावेळी बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी खासदार संभाजीराजे यांना बुलढाणा येथे येण्याचे आमंत्रण दिले. हे आमंत्रण भोसले यांनी उत्साहाने स्वीकारले. ही भेट 29 एप्रिल रोजी पार पडली.
विधानसभेतील सुमारे 35 आमदारांची अंदाज समिती अलिबाग व रायगड दौऱ्यावर होती. हा दौरा 27 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान पार पडला. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. याच वेळी या ठिकाणी खासदार संभाजीराजे भोसले हेदेखील आले होते. दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर बराच वेळ दोघात दिलखुलास गप्पा झाल्या. बुलढाण्यात सुरू असलेल्या शिवस्मारक व इतर किल्ले स्मारकांची माहिती खासदार भोसले यांनी यावेळी घेतली. या माहिती पश्चात खा. भोसले यांनी आ. गायकवाड यांच्या कार्याची स्तुती केली. बुलढाण्यात 14 मे रोजी संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. या उत्सवात सहभागी होण्यासाठी खा. भोसले यांना आ. गायकवाड यांनी आमंत्रण दिले. मात्र
14 मे रोजी किल्ले पुरंदर येथे विशेष कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातून सवड मिळताच आपण बुलढाण्यात येऊ असे आश्वासन दिले.
यावेळी जालू भाग्यवंत गो टू एअर मुले आदी मंडळी उपस्थित होती.
