भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त इतिहास विभागाचे वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जिवनावर चर्चासत

 भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त इतिहास विभागाचे वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जिवनावर चर्चासत                          






मेघा जाधव शहर प्रतिनिधी चिखली 

स्थानिक :- श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त इतिहास विभागाचे वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जिवन व कार्य या विषयावर चर्चा सत्राचे २० एप्रिल २०२२ रोजी करयात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे आचार्य डॉ. ओमराज देशमुख तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगांव जामोद येथील सामाजिक कार्यकर्ते तथा इतिहासाचे अभ्यासक अमरीश पुंडलीक हे होते.


कार्यक्रमाचे प्रारंभी प्राचार्य डॉ. देशमुख यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्यातील योगदानाबद्दल आपले विचार व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन चरित्रातील विविध पैलु चिकित्सकपणे अमरीश पुंडलीक यांनी उलगडून सांगितले. नेताजी भाषचंद्र बोस यांची कार्यपध्दती देशाभिमान, कांतीकारी राष्ट्रवाद, स्वाभिमान याबाबत अमरीश इलीक यांनी विशेषणात्मक विचार मांडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरीत्राचा प्रभाव राजी सुभाषचंद्र बोस यांच्या जिवनावर कसा होता हे सुध्दा त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय इतिहास विभाग प्रमुख डॉ. विष्णु पडवाल यांनी आभार प्रदर्शन प्रा. डॉ. जे. जे. जाधव यांनी व्यक्त केले. या आभासी कार्यक्रमाचे प्रा. स्वप्नील प्रा. प्रफुल्ल पडघन यांनी तांत्रिक सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler