जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या हस्ते नवीन वाहनांचे उद्घाटन.
चिखली बुलढाणा | मयूर मोरे
🔅🔅🔅🔅🔅🔅 🔅🔅🔅
बुलढाणा :- आज शुक्रवार दिनांक 22 एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पोलीस विभागातील मोटार विभागाला 1 कोटी 50 लक्ष रुपये जिल्हा नियोजन समितीमार्फत मिळवून दिले.
मोटार परिवहन बुलढाणा यांच्याकडे तीनशे चार वाहने असून त्यापैकी 184 चार चाकी वाहने हे चालू स्थितीत आहे तर 54 मोटारसायकली असल्याची माहिती यावेळी पोलीस निरीक्षक एस एन पठाण मोटार परिवहन बुलढाणा यांनी दिली आहे
वाहनांची कमी लक्षात घेता
यातून 17 नवीन बोलेरो 2 मोटर सायकल टीव्हीएस 9 मोपेड खरेदी करण्यात आल्या आहेत त्याचे आज जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक एस एल पठाण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्यासह पोलीस कर्मचारी यावेळी
उपस्थित होते ही वाहने डायल 112 व दामिनी पथक का करिता वापरण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
