गुंजाळा येथील शिल्पा आंधळे विवाहिता बेपत्ता





राजेंद्र डोईफोडे बुलढाणा जिल्हा संपादक

गुंजाळा येथील तीस वर्षीय विवाहिता घरात कोणाला  काहीही न सांगता घरातून निघून गेली घरच्यांनी शोध घेतला असता कोठेही मिळून आली नाही. अशी तक्रार नातेवाइकांनी 28 एप्रिल रोजी पोलीस स्टेशनला दिली.

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुंजाळा येथील रहिवासी असलेले संजय आंधळे हे त्यांच्या पत्नीला व दोन मुले आणि आई सर्वजण आनंदात राहत होते.मागील वर्षी पत्नी शिल्पा संजय आंधळे वेडसर करीत असल्याने तिच्यावर घरच्यांनी औषध उपचार करून बरे केले होते मात्र दोघांचा संसार सुरु असताना अचानक 27 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घरात कोणालाही काहीही न सांगता घरून निघून गेली. संध्याकाळ झाली तरी ती घरी परत आली नाही म्हणून घरच्यांनी तिच्या आई-वडिलांना कळवले त्यामुळे लगेच सर्वांनी मिळून तिचा नातेवाईकाकडे आजूबाजूच्या गावात शेतात शोध घेतला असता तर कोठे मिळून आली नाही. अशी तक्रार पती व मुलीचे नातेवाईक यांनी पोलीस स्टेशनला दिली. असतात पोकाॅ पोफळे यांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली असून ही महिला कोणालाही दिसून आल्यास तात्काळ अंढेरा पोलीस स्टेशन संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler