तिन वर्षांपासून लपाचिपीचा डाव खेळणाऱ्या गुन्हेगाराला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेलबंद
चिखली| मयूर मोरे तालुका प्रतिनिधी
बुलढाणा:- गेल्या तीन वर्षांपासून पोलीसासोबत लपाछपी खेळणाऱ्या गुन्हेगाराला अखेर जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे .सदर आरोपींची गुप्त माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने ग्राम पोलीस स्टेश मलकापूर येथे जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने फरार आरोपीचा शोध मोहीम राबवत आरोपी पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे याची माहिती मिळताच पोलिसांनी दाताळा मलकापूर येथुन आरोपीला ताब्यात घेतले .आरोपींची संपूर्ण चैकाशी करूण पोलीस स्टेश शिवाजी नगर खामगाव येथे अप क्र 87/2019 कलम 395,34,402,120(ब) सह कलम 135 मपोका असे गुन्हे दाखल असल्याचे समजले .सदर आरोपी नामें बबन उत्तम मोहीते वय 42 वर्ष राहणार इंदिरा नगर दाताळा मलकापूर याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन शिवाजी नगर खामगाव यांच्या स्वाधिन करण्यात आले आहे .
या सर्व कार्यवाही साठी जि.पो. अधिक्षक अरविंद चावरीया बुलढाणा मा .श्रावन दंत्त अंप्पर पो अधिक्षक खामगाव , बजरंग बन्सोडे अंप्पर पो अधिक्षक बुलढाणा , यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बळीराम गिते स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा श्री मनिष गावंडे सह पोलीस निरीक्षक , पोलीस अंमलदार रामराजे राजपुत व ईत्यादी सर्वचं स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा .
