विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची - प्रा. डॉ. सुबोधकुमार सिंह
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- येथील लोकमान्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने बुधवार 6 एप्रिल ला पालक व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात अध्यक्षस्थाानी डॉ. सुबोध कुमार सिंह(प्राचार्य,लोकमान्य महाविद्यालय ,वराेरा) होते.त्यांनी पालक व माजी विद्यार्थी कार्यकारिणीने महाविद्यालयाच्या विकासात काय करणे अपेक्षित आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. श्रीकांत पुरी (इंग्रजी विभाग प्रमुख, लोकमान्य महाविद्यालय, वराेरा)व्यासपीठावर उपस्थित होते.त्यांनी पाल्याच्या विकासात शिक्षकांबरोबरच पालकांचीही भूमिका महत्त्वाची आहे ,याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.संदीप डाखरे (माजी विद्यार्थी प्रतिनिधी,लोकमान्य महाविद्यालय, वराेरा)उपस्थित होते,त्यांनी महाविद्यालयात असताना शिक्षक व मित्रांसोबत आलेल्या अनुभवांना उजाळा दिला.तसेच याप्रसंगी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी श्री गजानन निखाडे होते. या कार्यक्रमात माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून श्री.नामदेव बागेसर व श्री. रुपेश वनसिंगे यांनी मनोगत व्यक्त केले तर पालक प्रतिनिधी म्हणून श्री. शशिकांत दातारकर व श्री. बोधे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रवींद्र शेंडे ,प्रास्ताविक प्रा. डॉ. दीपक लोणकर तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. श्रीनिवास पिलगुलवार यांनी मानले.या कार्यक्रमाकरीता महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
