आनंद निकेतन महाविद्यालयात नेट सेट मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- 6 एप्रिल ला स्थानिक आनंद निकेतन महाविद्यालयातील इतिहास विभागा कडून प्राध्यापक पात्रता परीक्षा( NET, SET) विषयावर आधारित मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. उगेमुगे सर यांनी साध्या, सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना नेट सेट च्या पहिल्या पेपर साठी सखोल मार्गदर्शन केले. डाँ.उगेमुगे सर हे स्वतः UGC नेट परीक्षेत एकूण सात वेळा उत्तीर्ण झाले असून दोन विषयात त्यांनी पीएच.डी केली आहे. सध्याचे UGC नेट परीक्षेचे नवीन स्वरूप व त्यासाठी आवश्यक तयारी तसेच पुस्तके, स्टडी मटेरियल ते स्वतः काढवयाच्या नोट्स याविषयी विद्यार्थ्यांना त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काळे सर यांनी विद्यार्थ्यांना प्राध्यापक होण्याची बौद्धिक आणि मानसिक तयारी याविषयीचे मार्गदर्शन करून केला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभागाची विद्यार्थिनी कु.जिज्ञासा लोडे प्रस्ताविक आणि परिचय इतिहास विभाग प्रमुख प्रा. अरविंद ढोके सर आणि आभार कु.उमा डोंगरे हिने केले या कार्यक्रमाचा महाविद्यालयातील कला आणि वाणिज्य दोन्ही शाखेच्या पदवित्तर विभागाच्या 127 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला तसेच सर्व पदवित्तर विभागाचे प्राध्यापकही या व्याख्यानास उपस्थित होते.
