माणूस मिठाशिवाय जगू शकतो पण पाण्याशिवाय नाही.

 माणूस मिठाशिवाय जगू शकतो पण पाण्याशिवाय नाही 






मुन्ना ठाकूर विशेष प्रतिनिधी बुलढाणा जिल्हा

बुलडाणा येथे बीजेएन लाईव्ह कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 131 व्या जयंतीनिमित्त अभिवादन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बीजेएन लाईव्ह चे संपादक  समाधान चिंचोले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

   समाधान चिंचोले यावेळी असे म्हणाले की माणूस मिठाशिवाय जगू शकतो पण पाण्याशिवाय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बीजेएन लाईव्ह कार्यालयासमोर व तहसील कार्यालयासमोर पाणपोई सुरू करण्यात आली आहे.

 बुलढाणा ची परिस्थिती पाहता खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांना पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी या उन्हामध्ये पिण्यासाठी मिळावे या हेतूने पाणपोई सुरू करण्यात आली.

 बीजेएन लाईव्ह चे मुख्य संपादक समाधान चिंचोले, संपादिका दुर्गा खेडेकर, सहसंपादक गजानना झगरे, संदीप लहाने, राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंच संस्थापक अध्यक्ष अंबादास घेवंदे, गणेश लाड, विजय बिलारी, दैनिक सम्राट चे जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब जाधव, शेषमल शिंगणे, नारायण गवई, यांसह आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler