खामगाव तालुक्यातील आवार येथे जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉलेज मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी...

 खामगाव तालुक्यातील आवार येथे जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉलेज मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी...






अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी 8262087866,


आज दि १४ एप्रिल २२ रोजी जिजाऊ स्कूल अँड गुंजकर कॉलेज आवार येथे डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेच्या सचिवा प्रा.सौ.सुरेखाताई  गुंजकर व मुख्याध्यापक श्री संतोष अल्ल्हाट सर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ बाबासाहेबांनी देशासाठी केलेल्या कार्याबद्दल तसेच त्यांनी घेतलेले उच्च शिक्षण, त्यांचे विचार आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली यात विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी कार्यक्रमाला

 घोडके सर, ब्राम्हने सर, निळे सर, हिवराळे सर, वांढे सर, बोचरे सर,  उत्पुरे सर, व्यवहारे मॅडम , गावत्रे मॅडम ,ठाकरे मॅडम, मोरे मॅडम, शेलकर मॅडम , लाव्हरे मॅडम ,डाबरे मॅडम, जंजाळ मॅडम,अकोटकर मॅडम, सांजोरे मॅडम, कुलकर्णी मॅडम, श्री अविनाश ठाकरे ,श्री निलेश कवळे, श्री नवनीत फुंडकर , श्री दामुभाऊ मिसाळ, श्री शिवा ठाकरे ,श्री तायडे , श्री घनमोडे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler