लोकनेते कॉम्रेड नाना कवीश्वर यांच्या ११ वा स्मृतिदिन उत्साहात संपन्न ;

 लोकनेते कॉम्रेड नाना कवीश्वर यांच्या ११ वा स्मृतिदिन उत्साहात संपन्न ;






अमोल भोलनकरबुलढाणा जिल्हा प्रतिनिधी 8262087866, लोकनेते कामगार कष्टकरी वर्गाचे कैवारी कॉम्रेड  नाना कविश्वर यांचा ११वा स्मृतिदिन दिनांक २० एप्रिल २०२२ रोजी खामगाव तालुक्यातील रोहणा येथे उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी मंचकावर अध्यक्ष म्हणून कॉम्रेड दादा रायपुरे,प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दादासाहेब कवीश्वर,कॉम्रेड अनिल गायकवाड,कॉम्रेड सी.एन .देशमुख ,कॉम्रेड एस.ए. जाधव ,प्राध्यापक वाघ सर ,कॉम्रेड पंजाबराव गायकवाड ,अजबे गुरुजी, प्राध्यापक प्रा.डॉ.अनिल अमलकार ,कॉम्रेड काळणे ताई ,कॉम्रेड    उदयभान सावंग ,कैलास सावंग,सरपंच रोहाणा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी नाना कवीश्वर यांच्या आठवणींना उपस्थितीती उजाळा दिला.कॉम्रेड नानांनी नेहमीच दीनदुबळ्या कष्टकरी शेतकरी वर्गाची बाजू घेतली.आहेरे आणि नाही रे वर्गाच्या लढाईमध्ये नेहमी त्यांनी नाही रे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले.त्यामध्ये दिवाळीच्या एक दिवस आधी कामगारांचे पगार करून घेणे असो किंवा आत्महत्येस प्रवृत्त झालेल्या शेतकरी कुटुंबाला स्वतःची दहा एकर जमीन कसण्या करिता देणे असो किंवा एखाद्या सरकारी कार्यालय मध्ये शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक असो चा सर्वाविरुद्ध त्यांनी नेहमीच आवाज उचलला.त्याचबरोबर आपल्या डाव्या पुरोगामी विचारांना जनसामान्यांपर्यंत पोचविले.व लाला बावटयाची निष्ठा लोकांमध्ये दृढ केली.त्यांनी अनेक बहुजन समाजातील तरुणांना योग्य दिशा दाखवून शिक्षणाकरिता प्रोत्साहित करून त्यांना आयुष्याचा योग्य मार्गावर नेले.त्यांचे सुखकर केले.अनेक रुग्णांचे व काम दवाखान्याचे काम करून त्यांना जीवनदान दिले.त्यांना वयाच्या ५२वर्षी कर्करोग झालेला असताना देखील जेव्हा वन कामगाराचे प्रश्न ऐरणीवर आला .तेव्हा त्यांनी आपल्या आजाराला बाजूला सोडून त्या कामगारांच्या लढाया मध्ये उडी घेतली.व त्यांना न्याय मिळवून दिला.अशा अनेक आठवणींना या वेळी उजाळा मिळाला.कॉम्रेड नानांच्या डाव्या विचारसरणीचा आजच्या काळामध्ये अत्यंत गरज असून जिथे मूलभूत प्रश्नांना बगल देऊन इतर गोष्टीकडे तरुणांचे व समाजांचे मन वळविण्यात येत आहे.त्यामुळे समाज भरकटत आहे .प्रचंड महागाई बेरोजगारी होत असून सर्वसामान्य गोरगरिबांचा कष्टकरी कुटुंबांना जगणे असह्य झाले.असून त्यांचा जगण्याचामार्ग सुकर करण्याकरिता कॉम्रेड नानांच्या विचारांना अधिक घट्ट करण्याची गरज आहे.त्याकरिता डाव्या विचारांची.व लाला बावटयाची पकड अधिक घट्ट करण्यासाठी गरज आहे.याकरिता डाव्या विचारांची व मजबूत करण्याचा निर्धार उपस्थित असलेले जनसमुदायाने केला.यावेळी कॉम्रेड नानाचे शेकडो चाहते उपस्थितीत होते.कॉम्रेड नाना कवीश्वर अमर रहे.कॉम्रेड नाना कविश्वर को लाला सलाम कॉम्रेड नाना के अरमानो को मंजिल तक पोहोच आयेंगे.अशा प्रचंड गर्जनानी परिसर दुम दुमन गेला.व स्मृतिदिन सभेची समाप्ती प्रचंड उत्सवामध्ये झाली.कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता नाना कवीश्वर स्मृतिदिन आयोजन समितीद्वारे कॉम्रेड प्रकाश पताळे ,कॉम्रेड जितेंद्र चोपडे,रवींद्र कवीश्वर,रवी देशपांडे,आणि भारसाकळे,मनोहर साठे,अनंतराव रावणकार ,अविनाश बावस्कर,सागर पताळे, डॉ.उदयराजपूत ,वसंता चोपडे ,दिलीप वाघ,सखाराम काटोले,सय्यद फसोद्दीन,कैलास फाटे,रोहाणा, वरणा, निमकवळा ,व पंचक्रोशीतील कॉम्रेड नानांच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक परिश्रम घेतले...

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler