खामगाव तालुक्यातील घारोड येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न ;
अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ८२६२०८७८६६, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घारोड येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न करण्यात आला .यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष भाऊ बाठे यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवीन वर्गात इयत्ता पहिलीत् दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यां चे स्वागत करून त्यांना शाळेमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आणि सध्याची त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी शाळेमध्ये सात स्टॉल उभारून त्यामध्ये त्यांची गुणवत्ता तपासण्यात आली आणि त्यांना पालकांनी विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे कृती प्रत्रिका व शाळेतील पहिले पाऊल हे पुस्तक देऊन त्यांचे मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. तसेच यानंतरही असाच दुसरा मेळावा आयोजित करायचा असून तोपर्यंत पालकांनी विद्यार्थ्यांची मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल याबाबत त्याला नियमित मार्गदर्शन करायचे आहे.शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सावळे सर .शिक्षक सर्वश्री काळे सर ,भोलनकर सर, वाइकर सर ,तिलेवाड सर , खरात सर, हिवराळे सर, कुमारी भुम्बरे मॅडम यांनी सहकार्य केले. तसेच गावातील विठ्ठल दांडले,विनोद दुतोंडे,अजाबराव इंगोले,अरुणाबाई इंगोले,गणेश गावंडे प्रतिष्ठित नागरिक सदर मेळाव्यासाठी उपस्थित होते. अंगणवाडी सेविका नलिनीताई इंगळे व प्रमिला ताई इंगोले तसेच मदतनीस थेटे ताई व इंगोले ताई उपस्थित होत्या .
