गोरगरीब,कष्टकरी,शेतकरी शेतमजूर, अपंग संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातून मदत करण्याच्यादृष्टीने .....!
चिखली l मयूर मोरे
मा आ. राहुल भाऊ बोंद्रे जिल्हा अध्यक्ष बुलढाणा जिल्हा काँग्रेस यांच्या नेतृत्वात आज राहुल भाऊ बोंद्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्ष समाधान भाऊ सुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार समितीची बैठक पार पडली......
या बैठकीमध्ये चिखली तालुक्यातील 621 निराधार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कार्य समाधान भाऊ यांनी केले आज मंजूर झालेल्या या लाभार्थ्यांना इसोली जिल्हा परिषद सर्कल मधील पिंपरखेड या गावांमध्ये गजानन भाऊ खंडारे यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांना आदेश वाटपाचा कार्यक्रम राहुल भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला होता त्यावेळी 17 लाभार्थ्यांना माझ्या हस्ते मजुरांची पत्र वाटून त्यांची सेवा करण्याची एक संधी मला पिंपरखेड वासी यांनी दिली,
यामध्ये बाकी राहिलेल्या निराधार व वृद्ध नागरिकांना, विधवा परितक्त्या अपंग व्यक्तींना लाभ देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन व कागदपत्र यासंदर्भात चर्चा करताना त्यांना दरमहा हजार रुपये पेन्शन मिळणार आनंद त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहून मला पुन्हा सामाजिक कार्य करण्याचे बळ मिळाले,,,,
यावेळी माझ्यासोबत जय बजरंग व्यायाम शाळा जिल्हा प्रमुख गजानन भाऊ खंडारे, गजानन जुमडे,मा, सरपंच गजानन भाऊ उमाळे, भिकाजी भाऊ आराख, राजेश भाऊ जुमडे, गजानन भाऊ बगाडे,मोहन खंडारे, उपस्थित होते,,,,,!!!
