लोकशाही चा चौथा आधारस्तंभ जिवंत राहिला पाहिजे

 लोकशाही चा चौथा आधारस्तंभ जिवंत राहिला पाहिजे

  चिखली | मेघा जाधव   




        
          

 चिखली‌ :-  लोकशाही मराठी पत्रकार संघ बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने चिखली तालुका पदाधिकारी यांचे 9 मे रोजी सकाळी 11 वाजता विश्राम भवन चिखली येथे ओळखपत्र वाटप व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक  व अध्यक्ष म्हणून मुकनायचे फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा यूवा उद्योजक सतीष पवार व दैनिक विदर्भ दर्पण चे संपादन मंगेषभाऊ पळसकर,जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे, ॲड.सचिन अवचार,जिल्हा संघटक सचिन खंडारे,चिखली तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र घुबे होते.तालुका अध्यक्ष शेख अजहर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

यावेळी मान्यवरांनी उपस्थितीतांना सखोल मार्गदर्शन केले व शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सतीष पवार यांनी पत्रकार जिवंत राहिला पाहिजे कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि देशाची लोकशाही चार आधार स्तंबा समोर ठेऊन जिवंत आहे यातील चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार व्हेंटिलेटरवर आहे आणि तो जर जिवंत राहिला नाही तर या देशाची खरी लोकशाही टीकेल की नाही असे प्रतिपादन मूकनायक फाउंडेंशनचे अध्यक्ष तथा उद्योजक सतीश पवार यांनी अध्यक्षपदावरून बोलताना केले. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन म्हणून दैनिक विदर्भ दर्पणचे संपादक मंगेशभाऊ पळसकर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सचिन खंडारे संघटक बुलढाणा जिल्हा लोकशाही मराठी पत्रकार संघ ॲड.सचिन अवचार, प्रशांतभैय्या डोंगरदिवे जिल्हाध्यक्ष लोकशाही मराठी पत्रकार संघ,चिखली तालुका अध्यक्ष शेख अजहर,सचिव, समाधान वानखेडे,कार्याध्यक्ष राजेंद्र घुबे,संपर्क प्रमुख चंद्रशेखर काळे,उपाध्यक्ष वंदना गवई, तालुका समन्वयक मेघा जाधव, तालुका सचिव रवी मगर,संघटक निलेश कोल्हे,आकाश जाधव, बुलढाणा तालुका अध्यक्ष प्रकाश जेऊघाले,सिद्धार्थ वानखेडे अमोल साळवे सिंदखेड राजा तालुका सचिव या कार्यक्रमांमध्ये उंद्री येथील रफिक उल्ला खान ची न्यूज चैनल चे पत्रकार महेंद्र हिवाळे बहिष्कृत भारत चे चिखली प्रतिनिधी यांचे लोकशाही मराठी पत्रकार संघामध्ये प्रवेश करून घेण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहिष्कृत भारत प्रतिनिधित्वाचा मराठी पत्रकार संघाचे तालुका प्रसिद्धीप्रमुख रघुनाथ गवई यांनी केले तर आभार वंदना गवई तालुका उपाध्यक्ष यांनी केले या कार्यक्रमासाठी लोकशाही पत्रकार संघाचे सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler