मुख्य चौकातील आठ दुकाने फोडली

 मुख्य चौकातील आठ दुकाने फोडली


रोख एक लाख लंपास ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

मुन्ना ठाकूर विशेष प्रतिनिधी बुलढाणा





 देऊळगाव राजा शहरातील मुख्य चौकात असलेल्या मदिना कॉम्प्लेक्स मधील सहा दुकानांसह एकूण आठ दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली, सदर घटना आज उघडकीस आली असून एकूण १ लाख २ हजार ५५० रुपये रोख चोरीला गेले आहेत पोलिसांनी सीसीटीव्हीत कैद अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला


याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शहराच्या मध्य भागातील संतोष चौकात अज्ञात चोरट्यांनी दुकानांची कुलूप कुंडे तोडून लोखंडी शटर वाकवून दुकानात प्रवेश केला व एकूण ७ दुकानातील एकूण १ लाख २ हजार ५५० रुपये रोख चोरून नेले यामध्ये मदिना कॉम्प्लेक्स मधील अपना जनरल स्टोअर, स्वामी समर्थ कम्प्युटर,संजेरी मोबाईल, सीमा जनरल स्टोअर्स, फाईन ड्रेसेस,लकी ऑफसेट,लेटेस्ट टेलर व कोटकर टायर्स चा समावेश आहे दरम्यान एकाच चौकातील आठ दुकाने फुटल्याची माहिती सकाळी लक्षात आल्यावर घडलेल्या घटनेची पोलिसांना माहिती मिळाली यावेळी स्वतः ठाणेदार जयवंत सातव,बीट जमादार प्रदीप गुंजकर,हेड कॉन्स्टेबल विनोद गवई घटनास्थळी पोहोचले व चोरट्यांनी फोडलेल्या दुकानांची पाहणी केली याबाबत मो. जाकीर मो.कौसर राहणार कबाड पुरा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला दरम्यान मदिना कॉम्प्लेक्स मध्ये चोरट्यांनी तब्बल तीन तास धुमाकूळ माजवला याचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे पोलीस या दिशेने तपास करीत आहे


फोटो ओळी देऊळगावराजा- चोरट्यांनी तोडलेल्या लोखंडी शटरची पाहणी करताना ठाणेदार सातव

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler