श्री शिवाजी महाविद्यालयात मोडीलिपी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 श्री शिवाजी महाविद्यालयात  मोडीलिपी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न               

  चिखली शहर प्रतिनिधी | मेघा जाधव  





     चिखली                            स्थानिक श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली, जिल्हा बुलढाणा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोडीलिपी प्रशिक्षण कार्यशाळा (Add- On-Course ) दि. ०४/ ०५/२०२२  ते ०९/०५/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती .सदर अभ्यासक्रमांतर्गत मोडी लिपीचे प्रशिक्षण सातारा येथील श्री विजय वाईकर यांनी Online आभासी पद्धतीने विद्यार्थी व शिक्षक यांना प्रशिक्षण दिले आहे.         मोडी लिपीचे प्रशिक्षण देत असतांना मोडीलिपीची बाराखडी,मोडीलीपीचे शब्द, जोडशब्द, वाक्य, कालगणना,पत्राचे प्रकार, मोडी लिपीचे प्रकार, मोडी लिपीतील उतारे या संपूर्ण बाबींचे प्रशिक्षण श्री विजय वाईकर यांनी विद्यार्थ्यांना दिले. सदर मोडी लिपीचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन एकूण  ३०  तासाचे सत्र आयोजित करण्यात आले होते. त्यापैकी दररोज दोन तास आभासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले होते व दररोज चार तास महाविद्यालयात उपस्थित राहून मोडी लिपीचा सराव मराठी विभागाच्या वतीने घेण्यात येत होता. सदर मोडीलिपीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात घेतले. मोडीलिपी प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप दि. ०९/०५/२०२२  रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयात मा. प्राचार्य डॉ. ओमराजे एस.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे मनोगत डॉ. गणेश मालटे यांनी व्यक्त केले. तर आय क्यू ए सी च्या समन्वयक डॉ. वनीता पोच्छी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रशांत डोंगरदिवे या विद्यार्थ्यांने सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. पवन मांडवकर व सचिव डॉ. अतुल सारडे यांनी मराठी प्राध्यापक परिषदेची भूमिका मांडली. त्यानंतर मोडी लिपीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शेवटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.अनुराधा मुळे यांनी केले. तंत्रस्नेही म्हणून डॉ. पडघन, प्रा. तृप्ती श्रीरामे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler