हातात खर्रा,पायात चप्पल आणी केबल च्या साह्याने स्वताच्या शेतातच गळफास घेऊन केली आत्महत्या

हातात खर्रा,पायात चप्पल आणी केबल च्या साह्याने स्वताच्या शेतातच गळफास घेऊन केली आत्महत्या

चिमुर तालुक्यातील नेरीजळच खा॓बाळा येथील घटना.

स्वतःच्या शेतात संपविली जीवनयात्रा


प्रतिनिधी नेरी।-प्रवीन वाघे

मो,7038115037



नेरीवरून जवळ असलेल्या खांबाडा येथील एका इसमाने स्वतःच्या शेतात काल रात्री कडूनिबाच्या झाडाला इलेक्ट्रिक केबल च्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली व आपली जीवनयात्रा संपविली सदर घटना सकाळी महिला शेताकडे जात असताना पहाटे 5 वाजता उघडीस आली

         सदर मृत इसम नामे वसंता विठोबा पडाल वय 57 वर्षे हे खांबाडा येथील रहिवासी असून ते चिमूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागात रोजनदारी कर्मचारी म्हणून काम करीत होते त्यांना दारूचे व्यसन होते यामुळे घरात वाद व्हायचे हा नेहमीचाच प्रकार  होता काल रात्री सदर घटना घडली असता पहाटे 5 वाजता महिलांना दिसताच त्यांनी गावाचे पोलीस पाटील संजय गायकवाड यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ चिमूर पोलीस स्टेशन ला फोन करून माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मेजर निमगडे आणि त्यांच्या चमुनी प्रेताला झाडावरून खाली उतरवुन पंचनामा केला व उत्तरणीय तपासणी साठी उपजिल्हारुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले मृत व्यक्तीचे दोन्ही पाय जमिनीवर गुडघ्यातून वाकलेले असून हातात खर्रा होता व दोन्ही पायात चप्पल होत्या पाय जमिनीवर टेकले होते  त्यामुळे आत्महत्या की अजून काही वेगळे अशी शंका कुशंका चर्चा होती वृत्त लिहिपर्यत आत्महत्या चे कारण कळू शकले नाही मयताच्या मागे पत्नी दोन मुले आणि तीन विवाहित मुली नातवंड असा बराच मोटा आप्तपरिवार आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler