नेरी-गौरखेडा तलावाजवळ लागलेल्या आगीत शेकडो झाडे जाळून खाक

नेरी-गौरखेडा तलावाजवळ लागलेल्या आगीत शेकडो झाडे जाळून खाक

भीषण आगीचे तांडव। लाखो रुपयांचे नुकसान

तब्बल दीड ते दोन  तासानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल


नेरी प्रतिनिधी,-प्रवीन वाघे,

मो,7038115037



चिमूर तालुक्यातील नेरी ला लागून असलेल्या गौरखेडा तलाव परिसरात कक्ष क्र 420  मध्ये दि 12 मे ला सायंकाळी 5 वाजता च्या सुमारास आग लागली पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करीत तलाव परिसर जंगल व्याप्त भाग व वनविभागाची रोपवाटिका कवेत घेऊन जाळून भस्म केली सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली परंतु वनाधिकारी व कर्मचारी 2 तास उशिरा घटनास्थळी दाखल झाले अशी माहिती नागरिकांनी दिली असून या आगीत लाखो रुपयांची रोपवाटिका व झाडे झुडपे जळून खाक झालेली आहेत. उशिरा का होईना कातर वनविभागाने तीन ब्लोअर मशीन ने आग आटोक्यात आणल्याची माहिती प्राप्त झाली. 

           नेरी गावाला लागून असलेल्या गौरखेडा तलाव परीसरात वनविभागाने यापूर्वी नर्सरी लावलेली होती त्या नर्सरी ला जगविण्यासाठी व देखभालीसाठी लाखो रुपये खर्च करून तिचे संगोपन करणे सुरू होते असे असताना अचानक लागलेल्या आगीत नर्सरी चे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून शासनाचे लाखो  रुपये या आगीत बुळालेले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही या आगीत संपूर्ण रोपटे व झाडे झुडपे जळून खाक झाली. आगीचे रौद्र रूप इतके भयंकर होते की आग नेरीला येऊन पोहचते की इतर आजूबाजूला असलेल्या गावात जाते अशी भीती नागरिकांत निर्माण झाल्यामुळे काही वेळासाठी नागरिक भयभीत झालेले होते तसेच परिसरातील शेतकऱ्यांची सुद्धा तारांबळ उडाली होती. 

        या कक्षातील संरक्षित जंगलाला लागलेली आग वनविभागा च्या कर्मचाऱ्यांनी आटोक्यात आणली असती तर रोपवाटिका किंवा इतर भाग जळून नष्ट झाला नसता व नुकसान झाली नसती यात संपुर्ण परिसर जळून भस्म झाला असून सदर आग वणव्यामुळे लागली की शॉर्ट सर्किट ने लागली हे मात्र कळू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler