कार्यकर्ताची हाक एकुन राज्यमंत्री बच्चु कडू नी संबंधीत अधीकार्या॔ना विचारला जाब.
बच्चु कडू चा तो एक फोन अन किती दिवसात मीळेल नेरीकरा॓ना शुद्ध पानी.
चंद्रपुर जिल्हा प्रतीनीधी-गनेश उराडे
चिमुर/- महाराष्ट्र प्राधिकरण पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण मंजूर होऊन कामाला सुरुवात होऊन कोट्यवधी रुपये खर्च करून बांधकाम पूर्ण झाले परंतु नेरी येथील दुषित पाणी पुरवठा व पाण्याची टंचाई व बंद असलेले जलशुद्धीकरण यंत्र तसेंच पाण्याची टाकी सुरू करण्यासाठी नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी दि 28 एप्रिलला प्रहार संघटना व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे प्रहार सेवक प्रवीण वाघे व शेरखान पठाण यांच्या नेतूत्वात पाण्याच्या टाकीवर चढुन विरुगिरी आंदोलन केले असून जोपर्यंत पाणी पुरवठा सुरू करण्याचे संबंधित विभाग लिखित आश्वासन देत नाही तोपर्यंत अन्न पाणी न घेता विरुगिरी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार प्रहार सेवकांनी केला होता,तब्बल 6 तास होऊनही महाराष्ट्र प्राधिकरण पाणी पुरवठा विभागाकडून कुनीही आंदोलन स्थळी पोहचले नाही शेवटी ठानेदार व तहसीलदार यांच्या मध्यसतीने आंदोलन मागे घेन्यात आल होत. याची तक्रार प्रहार सेवक शेरखान पठान व प्रवीण वाघे या॓नी राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू कडे केली होती राज्यमंत्री या॓नी या तक्रारीची दखल घेत ताबळतोब अधीकारी भालढरे या॓ना फोन करून किती दिवसात होईल असा प्रश्न केला असता संबंधीत अधीकारी या॓नी 8 दिवसात करून देतो असा शब्द दिला.त्यामुळे प्रहार च्या आंदोलनामुळे प्रहार सेवक व गावातील आंदोलनात सहभागी नागरीक या॓ना यश मीळुन नेरी शहराला 15 दिवसाच्या आत शुद्ध पानी मीळनार असे प्रहार सेवक या॓नी सांगीतले आहे.

