सिंदखेड राजा तालुक्यात शिवनी टाका येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार !
ग्रामस्थ भयभीत !
चिखली l मयूर मोरे तालुका प्रतिनिधी
सिंदखेड राजा तालुक्यातील शिवनी टाका येथे गेल्या चार दिवसापासून तेथील ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीने मुळे झाली आहे .शिवनी टाका येथील शेतकरी मोहम्मद कासिम चौधरी यांचे गट नंबर 117 मध्ये शेत आहे या शेतामध्ये त्यांची जनावरे बांधलेले असतात 30 एप्रिल च्या रात्री ते 1मे च्या पहाटेच्या सुमारास बिबट्यांनी शेतामध्ये बांधलेल्या गोऱ्या वर हल्ला चढवत त्याला ठार केले.
त्यानंतर सदर गोऱ्हा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जागीच ठार झाला .
ही घटना घडताच,
शेतकऱ्यांनी सकाळी वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी झालटे , तलाठी चव्हाण , सरपंच संतोष तांबेकर रघुनाथ देशमुख ग्रामसेवक सुधाकर नागरे यांनी शेतावर जाऊन घटनास्थळाची पाहणी केली व घटनेचा पंचनामा केला. शिवनी टाका मध्ये झालेल्या या बिबट्याच्या हल्ल्यामुळे हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,
गेल्या चार दिवसापासून शिवनी टाका परिसरामध्ये बिबट्या लोकांना दिसत आहे .त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून जनावरांना सुद्धा जनावरे शेतात नेण्यासाठी लोक घाबरत आहेत .
एक बिबट्या व त्यासोबत आणखीन दोन त्याची पिल्ले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .
वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
