कोनड खुर्द येथील शेतकरी पुत्र उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असुन देखील कायम ठेवली शेतीनिष्ठा

 कोनड खुर्द येथील शेतकरी पुत्र उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असुन देखील कायम ठेवली शेतीनिष्ठा                  

चिखली | मेघा जाधव






आम्ही पिकवू शकतो तर विकू पण शकतो 

देऊळगाव घुबे ता.चिखली :- विदर्भातील बुलढाणा जिल्यातील चिखली तालुक्यातील कोनड खुर्द येथील शेतकरी पुत्र हे सध्या यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असुन त्यांचे वडील ज्ञानेश्वर जावळे भाऊ हे  हाडाचे शेतकरी असुन सोयाबीन व तूर याला पर्याय म्हणून त्यांनी योग्य मार्गदर्शनाने 2 एकरात 14 बाय 7 वर 870 झाडे केसर आंबा लागवड केली.आंबा लावल्यावर  यावर्षी आंबा उत्पादन घेण्यात आले परंतु आंबा विकण्यासाठी व्यापारी यांच्याशी संपर्क सुरू करण्यात आला,व्यापारी यांना आंब्याचे फोटो व 250 ते 350 ग्राम पर्यंत वजन असल्याने विडिओ पाठवण्यात आले,व्यापारी पण केसर आंबा निर्यात योग्य माल आहे सांगू लागले,बागेस भेट दिली व आंब्याचा माल कमी आहे व कमी भावात मागू लागले व गुजरात चा केसर आला या वर्षी आंबा खुप आला आहे भाव पडतील,आंबा व्यापारी हे छत्तीसगड झारखंड इकडील असून गोड बोलून शेतकरी विश्वास ठेवतात,शरद जावळे यांनी सुद्धा नोकरी च्या व्यापामुळे त्याला खुप विनंती केली की माल जर 2 दिवसात नाही तोडला तर झाडावर पिकेल हे दिनांक 7 मे ला व्यापारी बाग पाहताना त्यांच्या वडीलांना सांगत होते तर आम्ही पण त्यांना विनंती करत होतो की तुम्ही उद्या आंबा तोडा भावाचे नंतर पाहू पण ते म्हणाले माल कमी आहे वाहतूक साठी पुरणार नाही ते त्याला वाहतूक खर्च सुद्धा देतो पण आंबा उद्याच तोडा पण त्यांनी ते मान्य केले नाही व ते निघून गेले,अशा परीस्थीतीत ते गेल्यावर वडील त्यांना म्हणाले 'आम्ही शेतकरी काही पण पिकवू पण आम्ही विकू शकत नाही"तू जो पर्यंत घरी आहे तो पर्यंत तू ही बाग व्यापारी याला देऊन टाक आम्ही कोठे जाणार आंबा विकायला वडील आता तणावात होते त्यांच्या चेहऱ्यावर तणाव जाणवत होता व मला पण वाटलं की मी उगाच पीक पध्दतीत बदल करून केसर आंबा लावला,पण मला माहित होते की आपल्या मालाचा दर्जा व गुणवत्ता चांगली असेल व थोडे मार्केट चा   अभ्यास केला व तर आपण सुद्धा स्वतःहा विकू शकतो,मग त्यांनी त्यांचा विचार आई वडील व पत्नी ला सांगितला ते मला म्हणाले,तू ज्या पदावर नोकरी करत आहे ते तुला शोभणार नाही,लोक नाव ठेवतील,ते म्हणालो आपल्या शेतातील माल विकायला काय लाज व जर आपण केसर आंबा आपण व्यवस्थित बॉक्स मध्ये कच्चा केमिकल शिवाय व विषमुक्त कोणत्याही प्रक्रिया न करता झाडाचा तोडलेला व शेतात पॅकिंग करून दिला व लोकांना गुणवत्तचे खात्री दिल्यास आपण पण विकू शकतो,त्यांची सुट्टी रविवारी संपणार होती मग निर्णय मी घेतला व बॉक्स पण नव्हते व ते कसे पॅक करायचे आंबा कसा तोडायचे याचे पाहणी त्यांनी रसूलशेठ पैठण येथे जाऊन आले त्याची विक्री व्यवस्थापन पाहिलं व त्यांनी व्यवस्तीत मार्गदर्शन केले,बॉक्स मग त्यांच्या मामाकडे डाळिंब चे 10 kg चे होते तेच वापरून ते,व पत्नी व भाऊ,भावजय यांना आंबा कसा तोडायचा व पॅकिंग कसे करायचे सांगितले व नंतर आंबा तोडणे चालू केले,व त्यांनी त्यांच्या कार मध्ये 140 किलो चे 14 बॉक्स आंबा नेले नेतांना त्यांच्या कडे फक्त 10 kg ची ऑर्डर होती ते रविवारी वणीत गेले,व हा केसर आंबा आमच्या शेतातील असून कोणत्याही प्रकारे प्रकिया न करता झाडाचा असून काही फोटो त्यांच्या बागेचे आंबा तोडतानाचे होते त्याचे छोटे पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन त्यांच्या मुलीने तयार केले व ते मोबाईल वर सांगितले बघता बघता  सकाळी 11 पर्यंत  सर्व बॉक्स हातोहात विकले व आंबा ची टेस्ट घेतल्यावर व लोकांच्या प्रतिक्रिया आल्यावर मला दुसऱ्या दिवशी 400 किलो ची ऑर्डर  माझ्या पत्नी कडे आली  मग मी गावाकडून ट्रॅव्हलवर बाबांनी व्यवस्तीत पॅकिंग करून आंबा पाठवला व तो सुद्धा आंबा आम्ही दुसऱ्या दिवशी आम्हाला मान्य असण्याऱ्या भावात माझ्या पत्नी व मुलीने  विकला,आता पर्यंत 1.12 टन आंबा आम्ही विकले.यावरुन असा अनुभव आला की आपण थोडी रिस्क आपल्या शेतकरी बांधवांनी घेतली व स्वतःहा कोणतीच प्रकारची लाज न धरता व लोक काय म्हणतात याचा विचार न काम केल्यास व आपल्या मालाची गुणवत्ता मध्ये तडजोड न केल्यास आपल्या मालाला व्यवस्थित भाव मिळतो.त्यांना त्यावेळी त्यांच्या वडीलांच्या चेहऱ्यावर असणारा तणावाची जागा आता आनंदाने घेतली याचे समाधान होते.त्यांची मेहनतीचे चीज झाले होते व त्यांना हे करणे गरजेचे होते कारण बाबाचा सुद्धा आत्मविश्वास कमी झाला असता तो कमी न होऊ देणं व एक चांगला ओरिजनल केसर आंबा (महाराष्ट्र शासनाच्या पिकवेल तो विकेल योजनेप्रमाणे )शेतकरी ते ग्राहक यांच्या पर्यन्त नैसर्गिक पद्धतीने केमिकल मुक्त व विषमुक्त कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता विकता आला व चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ मीळवुन देखील आंबा ज्यांनी घेतला त्यांच्या प्रतिक्रिया ह्या अनमोल होत्या त्यामुळे आपण घेतलेला निर्णय चुकीचा नव्हता व पुढे natural निर्मल- सुरेख केसर आंबा या ब्रँड ने विकणार हा संकल्प केला आहे.तरी आपण संपर्क व अधीक मार्गदर्शनासाठी   फोनवर चर्चा करु शकता.(डॉ शरद जावळे- पाटील

उपजिल्हाधिकारी यवतमाळ 9763817614) क्रुपया वरील

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler