नगरपालिकेची अतिक्रमण धारकावर बेधडक कार्यवाही

 नगरपालिकेची अतिक्रमण धारकावर बेधडक कार्यवाही

 मुन्ना ठाकूर विशेष प्रतिनिधी बुलढाणा






देऊळगावराजा शहरात प्रथमच रहात असलेली घरे पाडण्याची मोहीम


आज दिनांक 24/5/2022 रोजी सकाळ पासूनच देऊलगावराजा शहरातील वॉर्ड नंबर 2 मधील समता नगर जवळ वसलेल्या अतिक्रमित झोपरपट्टीत रहवाशी असलेल्या कच्चे पत्राचे तर काही पक्के वीट मातीचे बांधकाम असलेल्या घरे पडण्याची मोहीम सुरू झाली,

या अतिक्रमण जागेची जमीन ही कोष्टी साळी समाजाच्या समशान भूमी साठी शासनाने बऱ्याच वर्षा पूर्वी दिलेली होती व त्या जागेत त्यांच्या पूर्वजाच्या काही समाधी आहेत परंतु अलीकडे त्या जागेवर त्यांच्या समाजाचे अंतविधी होत नसल्याने ती जागा रिक्त खाली असल्यामुळे गोर गरीब , मजूर लोकांनी राहण्यासाठी तेथे अतिक्रमण करून घरे बांधली व त्यांना रहवाशी म्हणून नगरपालिकेने टॅक्स पावती देऊन नळ पाणी सुविधा , वीज सुविधा उपलब्ध करून सुद्धा दिल्या,

परन्तु मागील दोन वर्षा पासून कोष्टी समाजाच्या लोकांनी त्यांच्या हक्काच्या समशान भूमी जागेची मागणी करत नगर पालिका प्रशाषणाकडे पाठपुरावा केला त्यामुळे जवळपास 6 महिन्यासापुन त्या जागेवरील रहात असलेल्या लोकांना नगरपालिका यांनी हक्क नोंद रद्द करण्याच्या नोटिसा दिल्या तसेच जागा खाली करण्याच्या सुद्धा रीतसर नोटीस बजावल्या परन्तु तेथील लोकांनी जागेचा ताबा न सोडल्याने अखेर आज रोजी त्यांच्या रहात असलेल्या घरावर बुलटोजर चालुउन घरे पाडण्यात आली,

 *आता पर्यन्त देऊलगावराजा शहरातील रहवाशी घरे पाडण्याची पहिलीच घटना आहे,* 

 *एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू* 

कारण, एकीकडे समशान भूमीची जागा ताब्यात मिळाल्याचा मुद्दा तर दुसरीकडे गोर गरीब जनतेचा राहण्याची समाश्या,,

पण गोरगरीब जनतेची आज झालेली अवस्था मनाला वेदना देऊन गेली

 *अतिक्रमण फक्त गरिबांचे काढणार की श्रीमंतांचे सुदधा*

अश्या प्रकारची कुजबुज अनेक लोकांमध्ये होतांना दिसली,,,

तर यावर नगरपालिकेचे सिंघम मुख्यकार्यकारी अधिकारी मोकळं साहेब यांनी ठाम भूमिका घेत देऊलगावराजा शहरात अडथळा निर्माण करणारे बस स्टॉप चौक परिसरातील तसेच चिखली रोड व जाफराबाद रोड लगतचे  सर्व अतिक्रमण पाडण्यात  येत आहे व जे जे बाकी आहेत ते ते पाडण्यात , व काढण्यात येईल अशी ठाम भूमिका सिंधम मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब यांनी घेतली त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

खरच अतिक्रमण काढण्यात आल्याने गुदमरलेले देऊलगावराजा शहर मोकळा स्वास घेईल  याकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे

बातमी लिही पर्यन्त अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरूच होती

या मोहिमेत नगरपालिकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मोकळं साहेब सकाळ पासून स्वतः हजर होते ,

त्याच बरोबर नगरपालिकेचे सर्व अधिकारी , कर्मचारी , विद्युत पुरवठा जागोजागी चालू बंद करून मदत करणारे mseb चे लाईनमन कर्मचारी व त्याचबरोबर सुरक्षा म्हणून पोलीस अधिकारी सातव साहेब, खाडे साहेब तसेच इतरही पोलीस कर्मचारी उपस्थित होते व त्याचबरोबर पत्रकार संघ व समाजसेवक, लोकप्रतिनिधी , माजी नगरसेवक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler