पंढरपूर येथे विश्वकर्मा पांचाळ सुतार सामाजिक संस्थेच्या वतीने वधु वर परिचय मेळावा संपन्न झाला.
अमोल भोलनकर बुलढाणा
जिल्हा प्रतिनिधी मो.८२६२०८७८६६
सदर कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा. श्री.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.तसेच समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंताचा सत्कार /सन्मान करण्यात आला.विवेक मोरे कॅप्टन इंडियन आर्मी राजेंद्र सुतार ,साै.कौशल्या सुतार,छाया राऊत ,सुनिता जाधव ,आधी सरपंच तसेच अमोल बेलकर,आचार्य वेद भूषण शकुंतला पिंपळे,सुषमा पांचाळ,उर्मिला मोरे,हया आदर्श शिक्षिका त्याचबरोबर सतीश अढवळकर,याला सिनेमा अभिनेता व बाळासाहेब सुतार उत्कृष्ट ग्राम योजना व विजय मोरे,व सखाराम डोरळे ,यांचाही सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रशांत परिचारक यांनी समाजाच्या रचनेमध्ये सुतार समाजाचे योगदान मोलाचे आहे.सृष्टीची निर्मिती विश्वकर्माने केले.त्याचे सर्व अनुवंशीकता सुतार समाज आज पर्यंत अंगीकारत आहे.पारंपारिक कौशल्याला आधुनिक साधनांची जोड देवुन समाजाने स्वतःबरोबर समाजाची प्रगती साधावी.पालकांनी व मुलीत बर शोधतांना नोकरी ,व्यवसाय, प्राधान्य द्यावे.पंढरपुरातील संत जळोजी मळोजी महाराज यांची शासन दरबारी संत म्हणून नोंद करण्यास विधानपरिषद,व विधानसभेमध्ये निश्चितपणे प्रयत्न करू व सुतार समाजातील अडीअडचणी सोडविण्यांचे आश्वासन दिले.समाजाशी असलेले नाते,असे वृद्धिगत राहील असेही सांगितले.प्रस्ताव विकास संस्था अध्यक्ष बाळासाहेब सुतार यांनी आतापर्यंत संस्थेने त्यांना केलेले कार्य व समाजाचे असणारे अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येऊन संघटित होणे गरजेचे आहे.तसेच समाजहितांच्या विविध मागण्या मांडल्या.प्रमुख अतिथी म्हणून हनुमंत राव पांचाळ सोलापूर जिल्ह्याचे संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्याचे कौतुक केले.व भविष्यात विशेषता:पश्चिम महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी समाज हितासाठी एकत्र लढा द्यावा.असे आवाहन केले.अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत गवळी यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करीत असताना समोर असलेले प्रचंड जन समुदाय हीच खरी त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने वधू-वरांनी आपली भावी जोडीदार निवडताना कर्तुत्व बघून निवड करावी.असे आवाहन केले.या कार्यक्रमाच्या निमित्त्याने मा.गणपतराव गायकवाड पुणे,चंद्रकांत डेकरी कोल्हापूर,इचलकरंजी गोपीनाथ दिवेकर,मुंबई आदींनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमास राज्यातून हरिचंद्र पांचाळ,लातूर विष्णू पांचाळ,जालना श्रीपाद भालेकर ,बीड विष्णू पांचाळ,अंबाजोगाई सुनील पांचाळ,राजेश भालेकर,रमेश आहेर नाशिक,मनीष लुले विराट विश्वकर्मा संस्थेचे अध्यक्ष अकोला,डॉ.नंदकुमार सुतार,मिरज आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रम करण्यासाठी वधूची संख्या 115 नोंदनी 140 वरांची नोंदणी अशी एकूण 255 वधु-वरांची नोंदणी झाली.यशस्वी कार्यक्रम करण्यासाठीसोलापूर जिल्ह्यातील कार्यकरणीतील सर्व पदाधिकारी चंद्रकांत सुतार ,पांडुरंग सुतार,विजय मोरे,नरसिंह सुतार,सखाराम डोरले,अरविंद सुतार,मधुकर अढवळकर,आनंद पिंपळे,दत्तात्रय पांचाळ, सतीश सुतार ,यशवंतराव सुतार,रवींद्र पांचाळ,भारत काळे,अंबादास सुतार,अनिल डोळस,पांडुरंग सुतार,भरत गवळी,सचिन सुतार ,सचिन सुतार(उत्तर सोनापूर) ज्ञानेश्वर पंडित, रविराज घोडके,शिवराज पांचाळ,रमेश सुतार,रावसाहेब रोकडे,उमेश कळपे ,श्याम सुंदरसुतार ,सखाराम डोरले,कालिदास अढवळकर,उमेश सुतार, सुभाष सुतार, विनायक सुतार,राजेश महामुनी,उद्धव सुतार,बाळासाहेब पांचाळ,शंकर सुतार,पोपट मोरे आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुषमा पांचाळ,प्रशांत वाघमारे यांनी केले.शेवटी मधुकर सुतार यांनी आभार मानले. 🌹🌹🚩🚩🙏🙏जय विश्वकर्मा🌹🌹🚩🚩🙏🙏
