ब्रेकिंग-अनेक समस्याच्या विळख्यात असलेली वादगग्रस्त नेरी ग्रामपंचयात च्या आवारातच पिसे परीवार करनार आत्मदाहन आंदोलन.
प्रतिनिधी नेरी। प्रवीन वाघे
मो,7038115037
चिमुर तालुक्यातील नेरी ग्रामपंचायत मागील अनेक दिवसांपासून अनेक समस्या आणि विषया वरून आंदोलनावरून चर्चेत आली असून वादग्रस्त ठरत आहे अशातच एका कुटूंबियाने ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविले नाही आणि कारवाई केली नाही तर ग्रा प कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करणार असल्याचे इशारा दिला आहे
सदर असे की नेरी येथील अशोक विश्वनाथ पिसे यांनी स्वतःच्या जागे वर एका इसमाने अतिक्रमण केले त्याबद्दल ग्रा प ला अनेकदा विनंती अर्ज निवेदन देण्यात आले तसेच स्वतः कार्यालयात जाऊन तोंडी लेखी माहिती सादर केली परंतु ग्रा प कार्यालयाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही तेव्हा 28 मार्चला याच अतिक्रमणाचा मुद्दा समोर ठेवीत अनेक समस्या घेऊन कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले तेव्हा दुसऱ्याच दिवशी सदर अतिक्रमण आठ दिवसात हटविण्यात येईल असे लेखी आस्वासन देण्यात आले सदर व्यक्तीला अतिक्रमण हटविण्यासाठी तीन नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात आले मात्र अनेक दिवस लोटून गेले तरी पण अजून पर्यँत कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने आर्थिक चिरीमिरी चा प्रकार तर झाला नाहीं ना अशी शंका व्यक करण्यात येत आहे सदर समस्ये बाबत परत एकदा उपोषणाला बसताच 29 एप्रिलला आठ दिवसात सदर अतिक्रमण हटविण्यात येईल असे लिखित आस्वासन देण्यात आले मात्र आठ दिवस पूर्ण होऊनही सदर अतिक्रमण हटविण्यात आले नाही आणि या बाबीकडे हेतुपूर्वक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे त्यामुळे17 मे ला अशोक पिसे यांनी संपूर्ण कुटूंबियासह आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे आणि जोपर्यंत अतिक्रमणावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
