माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांचे आश्वासन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकांनी स्वीकारला.

माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांचे आश्वासन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकांनी स्वीकारला.

पदभार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी प्रशासकीय मंडळ कटिबद्ध  

अमोल भोलनकर बुलढाणा 

जिल्हा प्रतिनिधी मो.८२६२०८७८६६


खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असून या बाजार समितीवर महाविकास आघाडीचे प्रशासक मंडळ नेमण्यासाठी महा विकास आघाडीचे सर्व नेते मंडळींनी सहकार्य केले.बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक मंडळ शेतकरी, कामगार ,अडते, व्यापारी,या सर्व घटकांच्या समस्याचे निराकरण करून पारदर्शकपणे कार्य करतील.बाजार समितीच्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी प्रशासक मंडळ कटिबद्ध राहील.अशी ग्वाही माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी दिली.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक ५ मे.२०२२रोजी बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ.सदानंद धनोकार यांचा पदग्रहण समारंभ पार पडला.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे ,शिवसेना शहर प्रमुख रमेश भट्टड, युवा सेनेचे निलेश देवताळु ,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष गणेश माने,विकास चव्हाण,महेंद्र पाठक,प्रहार संघटनेचे गजानन लोखंडकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय काटोले ,माजी नगराध्यक्ष सरस्वती खासने ,आधीची प्रमुख होती.या वेळी बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ .सदानंद धनोकार,राष्ट्रवादीचे अशोक हटकर,शिवसेना तालुकाध्यक्ष सुरेश वावगे,यांनी विचार व्यक्त केले.त्यानंतर  कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून डॉ.सदानंद धनोकार ,यांनी प्रशासक महेश कृपलानी यांच्याकडून  पदभार स्वीकारला.नवनियुक्त मुख्य प्रशासक डॉ .सदानंद धनोकार व प्रशासक अशोक हटकर, पुंजाजी टिकार,दामोदर ताठे,सुरेश वावगे,श्रीराम खेलदार ,सुरेश सिंहतोमर ,या प्रशासकांचा माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या हस्ते सत्कार केला.यावेळी माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद बगाडे ,महादेव बोचरे,सुरेश बगाडे,गोपाल सातव,मधुकर बगाडे,सचिन वानखडे,अनंत सातव,बाजार समिती मधील अडते व्यापारी असोसिएशन तर्फे बनवारी सेठ,टिबडेवाल,चका सेठ ,संघवी,अजय खंडेलवाल ,अजय अग्रवाल ,संजय झुनझुनवाला ,विवेक मोहता,आधी व्यापारी अडते बांधवांनी तसेच शिवसेने तर्फे उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे ,शहराध्यक्ष रमेश भट्टड,युवा सेनेचे निलेश देवताळु ,यांनी राष्ट्रवादीतर्फे माजी नगराध्यक्ष गणेश माने ,विकास चव्हाण,महेंद्र पाठक,प्रहार संघटनेचे तर्फे गजानन लोखंडकार ,यांनी मुख्य प्रशासक डॉ .सदानंद धनोकार व प्रशासकांचे अभिनंदन केले .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler