पट्टाभिषेक सोहळ्यामध्ये दिसले साखरखेर्डावासियांचे एकात्मतेचे दर्शन !
मिरवणुकीत पलसिद्ध महास्वामी यांच्या पालखी वर सरपंच दाऊद शेठ कुरेशी यांच्याकडून पुष्पवृष्टी !
चिखली | मेघा जाधव
सिंदखेडराजा तालुक्यातील विदर्भातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे श्री पलसिद्ध महास्वामी धर्म पिठामध्ये दिनांक पाच मे ते सात मे पर्यंत पट्टाभिषेक सोहळा सुरू आहे आणि या सोहळ्यासाठी संपूर्ण भारत देशातून कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाली आहे,दिनांक 6 मे रोजी
श्री पलसिद्ध महास्वामी यांच्या पालखीचे संपूर्ण साखरखेर्डा गावातून भाविकांच्या साक्षीने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली,
या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला संपूर्ण राज्यामध्ये भोंग्या बद्दल वातावरण पेटलेले असताना ,साखरखेर्डा यांनी मात्र पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्त सलग तीन दिवस हम सब एक है या म्हणी प्रमाणे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवलं,श्री पलसिद्ध महास्वामी यांची मिरवणूक जाफराबाद मोहल्ल्यामध्ये येताच ,साखरखेर्डा नगरीचे सरपंच दाऊद शेठ कुरेशी , व माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य आयुब शेठ कुरेशी ,यांनी श्री पलसिद्ध महास्वामी यांच्या पालखी वर पुष्पवृष्टी केली ,व मिरवणुकीचे स्वागत केले .एक आगळा वेगळा संदेश त्यांनी दिलेला आहे,
