देऊळगाव राजा तालुक्यातील अवैध धंदे बंद करा. मनसे बंडू राजे डोळस यांची मागणी..
जिल्हा संपादक राजेंद्र डोईफोडे
देऊळगाव राजा दि.८ तालुक्यातील अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला असून ठीक ठिकाणी दारू विक्री .सट्टा बाजार जुगार. चालू असून यामुळे युवक पिढी व्यसनाधीन होत असून त्यांचे आयुष्य देशोधडीला लागत असून संपूर्ण पिढी अवैध धंद्यामुळे वाईट मार्गाला जात आहे.
देऊळगाव राजा तालुक्यात ठीक ठिकाणी जसे संपूर्ण गाव गावात अवैध धंदे वाढले असून त्याचा परिणाम संपूर्ण समाजासाठी घातक आहे .वाढलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे असे निवेदन श्री. सातव साहेब यांना देण्यात आले. अवैध धंदे बंद न झाल्यास मनसे तालुका व शहर मनसे कडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे बंडू राजे डोळस शहराध्यक्ष. नवनाथ रामाने उपाध्यक्ष. देवा चव्हाण तालुका सरचिटणीस. सागर शिंदे अमर सावंत. रोहिदास सावंत सचिन बिगारी .अर्जुन चुनेकर अशोक खरात. ज्ञानेश्वर चव्हाण सोमनाथ शिंदे. योगेश शिंदे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
