विजेच्या कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची हजेरी:; विज पडून दोन जनावरे ठार:;
मयुर मोरे बुलढाणा जिल्हा उपसंपादक
११ जून
अमडापूर येथून जवळच असलेल्या हराळखेड , ईसोली, कारखेड , धानोरी, या परिसरामध्ये दि.११ जून रोजी दुपारी मान्सून पूर्वीच्या पावसाने विजेच्या कडकडाटयासह वादळीवाऱ्याने हजेरे लावली. मात्र अमडापूर परिसराला पावसाने हुलकावणी दिली आहे. व या दरम्यान हराळखेड येथील एका शेतकऱ्याच्या शेतात विज कोसळल्याने बांबूच्या झाडा खाली बांधलेले दोन जनावरे दगावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे ९०हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
****************** काही भागांमध्ये गेलेल्या ७,८ जून पासून अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली आहे. तर आज दि.११ जून रोजी दुपारी अचानक अमडापूर सोडून कारखेड, पिंपरखेड, धानोरी, व हराळखेड येथे वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली . यादरम्यान शेतकरी संजय हिम्मत राव बोस्के यांच्या हराळखेड शिवारात गट नं.१६६ मध्ये असलेल्या शेतात गोठयासमोर बांबुच्या झाडा खाली एक म्हैस व वगार बांधलेली होती. यांच्यावर विज कोसळल्याने दोन्ही जनावरे जागीच ठार झाले आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हि म्हैस चार महिन्याची गामन असून, ४ लीटर दुध देत होती . यावर त्या शेतकऱ्याच्या दैनंदिन खर्च भागत असे, हे दोन्ही जनावरे या अपघातात दगावली असल्याने शेतकऱ्यांचे जवळपास ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी ईसोली तलाठी यांनी कोतवाल बांगर यांना पाठवले आहे. सदर शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी होत आहे.