वादळी पावसाने आसाळा सह अनेक गावातील घरांचे मोठे नुकसान
आसाळा येथील जांभूळे परिवार झाले घरापासून पोरके घरातील अनाज पाण्यात
जिल्हा प्रशासनानी सर्वे करून तात्काळ मदत करावी अशी प्रहार सेवक किशोर डुकरे यांची जिल्हाधिकारी यांना मागणी
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- काल झालेल्या वादळी पावसाने वरोरा तालुक्यातील अनेक गावात घरांचे छत उडून मोठे नुकसान झाले असून काही कुटुंबीयांना घरात पाणी शिरल्याने अक्षरशः भर पाण्यात आपला जीव धोक्यात घालून दुसरीकडे आसरा घ्यावा लागला तर काही ठिकाणी घरातील अनाज पूर्णता भिजल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
आसाळा गावात जांभूळे परिवाराच्या घराचे छत उडाल्याने व त्यांच्या घरातील अनाज पूर्णता भिजल्याने त्यांच्यावर मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने एकीकडे शेतात पेरणी करण्यासाठी शेतकरी आनंदी झाला असला तरी दुसरीकडे अनेक घराचे व गोठ्याचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे या अस्मानी सुलतानी संकटात प्रशासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी प्रहार शेतकरी माजी तालुका प्रमुख किशोर डुकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.