आज अनुभवला मातीत मिसळणारा एक तालुका कृषी अधिकारी. संग्रामपूर तालुक्यातला पहिला कृषी अधिकारी

 आज अनुभवला मातीत मिसळणारा एक तालुका कृषी अधिकारी. संग्रामपूर तालुक्यातला पहिला कृषी अधिकारी.






राजेंद्र डोईफोडे बुलढाणा जिल्हा संपादक

शेतकऱ्याचे शेतात जाऊन उत्साहाने तिफन हाकणारा तालुका कृषी अधिकारी आज प्रथमच पहायला मिळाला 

तसा ही कृषी अधिकारी हा शेती व शेतकऱ्याशी निगडीत असावाच .पण सहसा असे कुठही पहायला  मिळत नाही. आज आपल्या संग्रामपूर तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यानी स्वतः तिफन हाकलत पेरणीत सहभाग नोंदवुन शेतकऱ्‍यांचा उत्साह वाढवुन देण्याचाच प्रयत्न केला .या बदद्ल करावे त्यांचे कौतुक . कारण साहेब कोणताही असो तो राहतो त्यांच्याच तोऱ्यात असा आमचा आज पर्यंतचा अनुभव आहे . तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांनी आज दै देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी काशिनाथ मानकर यांच्या शेतात जाऊन पेरणीच्या कामात सहभाग घेतला व स्वतः तिफन हाकलली . सरळ रेषेत वाहीलेली तिफन पाहून उपस्तीत सर्व पेरणी करणाऱ्यानी बनसोडे साहेबांच्या उत्सवाचे कौतुक केले . म्हणूनच म्हणावसे वाटते कृषी अधिकारी असावा तर असा . शेती माती मध्ये मिसळणारा .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler