नेरी येथील रस्त्याला लावण्यात येणारे गट्टू चे काम निकृष्ट दर्जाचे कंत्राटदारावर कारवाईची मागणी
नेरी येथील नेताजी वार्ड क्र 5 बुरुड मोहल्ला रस्त्याचे काम
या ठेकेदाराला संबंधीत इंजिनियर चा आशीर्वाद असल्याचे नागरीकांकडु सांगन्यात येत आहे.
प्रतिनिधी नेरी।-प्रवीन वाघे
नेरी येथील नेताजी वार्ड क्र 5 मधील बुरुड मोहल्ला येथे रस्त्याच्या बाजूला गट्टू लावण्याचे काम सुरू असून हे काम संपूर्ण निकृष्ट दर्जाचे असून काम अंदाजपत्रका नुसार होत नसून मनमानी प्रकारे साहित्याचा उपयोग न करता करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून सदर काम थांबवून पक्के काम करावे व कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
नेरी येथील बुरुड मोहल्ला येथे मागील काही दिवसांपूर्वी सिमेंट रस्त्याचे काम झाले आणि या रस्त्याच्या बाजूला गिट्टू लावण्याचे काम बाकी होते ते काम सध्या वेगाने सुरू असून सदर काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे सदर कामात गिट्टू लावताना मातीचा वापर करण्यात येत आहे त्या ठिकाणी सिमेंट चा वापर करून गटूटू लावायला पाहिजे त्यामुळे रस्ता हा पक्का होणार परंतु माती लावल्याने पावसाच्या पाण्याने माती वाहून जाईल आणि रहदारी सुरू झाल्यावर गटूटू निघून जातील त्यामुळे शासनाच्या निधी पाण्यात जाईल तेव्हा नागरिकांनी यावर आक्षेप घेतला आणि सदर काम हे निकृष्ट दर्जाचे असुन अंदाजपत्रकानुसार काम होत नाही आहे तेव्हा संबंधित विभागाने सदर काम थांबवून पक्का काम करावे आणि कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.