रोजगार सेवक संघटना चिमूर कडून महादवाडी सरपंच भोजराज कामडी यांचा जाहीर निषेध

रोजगार सेवक संघटना चिमूर कडून महादवाडी सरपंच भोजराज कामडी यांचा जाहीर निषेध

सरपंचांनी रोजगारसेवकाला अर्वाच्य भाषेंत शिवीगाळ प्रकरण

प्रतिनिधी नेरी।-प्रवीन वाघे


पंचायत समिती चिमूर येथे आज दि 23 जूनला  रोजगार सेवक संघटनेच्या वतीने महादवाडी येथील सरपंच भोजराज कामडी यांनी केलेल्या अशोभनीय वक्तव्यामुळे सार्वत्रिक जाहीर निषेध करण्यात आला.

              सविस्तर असे की  20 जुन रोजी काही ग्रामरोजगार सेवक खाणगाव येथील रोजगार सेवकाच्या मानधन चेकवर तेथील सरपंच स्वाक्षरी का करीत नाही असा जाब विचारायला गेले होते. पंचायत समिती सभागृहात उपस्थित काही सरपंच व ग्रामरोजगार सेवक यांच्यात सुरळीत चर्चा सुरु असताना मधेच  भोजराज कामडी सरपंच यांनी मध्येच दखल घेत उलटसुलट प्रत्युत्तर दिले. अशातच त्यांचा तोल घसरला व त्यांनी रोजगार सेवकांना अर्वाच्य भाषेचा वापर करून शिव्या दिल्या. यासंदर्भात  22 जून रोजी मा. संवर्ग वि. अधिकारी यांना निषेधार्थ निवेदन सादर करून आज पंचायत समिती कार्यालय समोर रोजगार सेवाकांनी बॅनर घेत जाहीर निषेध नोंदवीला. या निषेधाला सर्व रोजगार सेवक तसेच बऱ्याच सरपंच, ग्रामसेवक यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवीला होता. सरपंच कामडी यांची असभ्य वागणूक व अशोभनीय वक्तव्याबद्दल बऱ्याच अधिकारी आणि ग्रामसेवक व लोकप्रतिनिधीना माहिती असून आजपर्यंत सर्वांनी संयम ठेवला. मात्र आता जीभ जरा जास्त घसरल्याने सर्व रोजगार सेवाकांनी एकत्र येत जाहीर निषेध केला.अश्या अशोभनीय वक्तव्य करणाऱ्या सरपंचाला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी होत आहे.

मी जर का चुकीचे व्यक्तव्य केले असेल तर मला पुरावा द्या मी माफी मागतो परंतु दोन दिवसानंतर माझ्यावर असे बोलले म्हणून आरोप करणे चुकीचे आहे त्याच दिवशी मला समोरासमोर म्हणायला पाहिजे होते हे माझ्याविरुद्ध विरोधकांचे षडयंत्रआहे

सरपंच भोजराज कामडी महादवादी

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler