*कपिला नदीला पूर तर नागणगाव नाल्याच्या पुरात ट्रकटर बैलगाडी थोडक्यात वाचले; वीज पुरवठ्याची डोखेदुखी कायमच!*
मयुर मोरे बुलढाणा जिल्हा सहसंपादक
देऊळगाव राजा तालुक्यातील नागणगांव या परिसरात आज २४जूनच्या दुपारी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत होते व या पावसाने येथील कपिला नदी ला पूर आला होता ती दुथडी भरून वाहत असल्याने पुलावरुन सुद्दा पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली होती या पावसाने बळिराजा सुखावला असून या भागातील कपाशी भेंडी लागवडी सोबतच तूर सोयाबीन मुंग उडीद आदी पेरण्या अंतिम टप्प्यात असून पेरणी पूर्ण करण्यासाठी बळिराजा दिसून येत असून विविध प्रकारच्या समस्येवर मात करून बळीराजा ने पेरणी आटोपली असून काही शेतकरी यांनी बँकेचे पीक कर्ज घेतले असून अनेक शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असतांना बँकांकडून आगोदर थकीत पीक कर्ज नवीन दाखविण्यासाठी आटापिटा सुरू असून तातडीने नवीन पीक कर्ज वाटप लवकरच पूर्ण करावे ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कपिला नदीला आलेल्या पुराणे पुलाच्या मोऱ्या मोकळ्या करण्यासाठी तरुणाई सरसावली व पुला वरील मोऱ्या मोकळ्या करण्यासाठी भारत शिंदे पोलीस पाटील ,अंकुश शिंदे रामेश्वर शिंदेग्रामपंचायत सदस्य, किशोर जाधव शंकर शिंदे चंद्रनदन जाधव गजानन शिंदे नाथा शिंदे, सुनील देशमुख ग्रामपंचायत सदस्य,पत्रकार स्वप्नील शिंदे यांनी प्रयत्न केले.तसेच येथून जवळच असलेल्या नागणगाव येथील गावाच्या पूर्वेस असलेल्या नाल्याला आलेल्या पुराणे सुद्दा रुद्र रुप धारण केल्याने एक बैल गाडी बोरुडे यांची तर ट्रकटर सरोदे यांचे पुराच्या पाण्याची पातळी न समजल्याने वाहत असताना ग्रामस्थ यांच्या सतर्कते मुळे थोडक्यात बचावले व पुलावरून सुखरूप बाहेर काढण्यात आले
वीज पुरवठा बनला डोखेदुखी;
पाडळी शिंदे परिसराला देऊळगाव मही सब स्टेश कडून वीज पुरवठा करण्यात येत असून डीग्रस गावठाण फिडर वर वीज पुरवठा नेहमीच खंडित होत असून २३जूनच्या रात्री हवा व पाणी नसतांना वीज पुरवठा खंडित झाला होता तो २४जूनच्या दुपार पर्यंत वीज पुरवठा आला आला गेला गेला ही परिस्थिती कायमच होती व सावखेड नागरे येथिल वीज पुरवठा वाहिनी विविध प्रकारच्या समस्येच्या गर्तेत असून सावखेड नागरे चे जनमित्र यांच्या वेळकाढू पणा मुळे वीज तार यांना झाडाच्या फांद्या नि विविध ठिकाणी जाळे बनले असून सावखेड गावाला वीज पुरवठा करणारे वीज रोहित्र याचे पोल झुकलेले आहे व इतरही वीज समस्या असून जनमित्र अपडाऊन करीत असल्याने या सर्व समस्यांकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत असून या सर्व प्रकारच्या समस्येमुळे डीग्रस गावठाण नेहमीच बिघाड होऊन बंद राहत आहे याकडे कनिष्ठ अभियंता अंढेरा व देऊळगाव मही यांच्या सह उपकार्यकरी अभियंता यांची जाणीव पूर्वक डोळेझाक परिसरासाठी डोखेदुखी ठरत असून सावखेड गावठाण व कृषी पपं गावठाण वरच असल्याने इतर गावांना यामुळे वीज पुरवठा नियमितपणे खंडित होण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.