भिमराव चाटे मा सैनिक
80 5556 8866
प्रतिनिधी देऊळगाव राजा
दे राजा चिखली रोडवर गणपती मंदिर व सद्गुरु रामचरण दास महाराज मंदिर वर दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांची मांदियाळी जमली होती.
अनेक वर्षापासून गणपती मंदिर आळम फाटा येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते त्यानिमित्त पंचक्रोशीतून भाविक भक्त गुरु दर्शनासाठी येतात सकाळी श्री रामचरण दास महाराज यांच्या समाधीवर महा अभिषेक झाला, पूजा आरती करून नैवेद्य अर्पण करून बाबांची मानस कन्या शांताबाई सानप यांनी सर्व भक्तांना सद्गुरु स्थानी ओवाळून औक्षण केले व 16 पक्वान्नाचा महाप्रसाद या माता माऊल्यांनी भक्त मांदियाळी ला भरवला. त्यात शांताबाई सानप, शिवगंगा श्रीधर मांटे, शारदा मांटे , मीरा जायभाये, संगीता जायभाये, सिंधू जायभाये, नंदू जायभाये,बाजीराव जायभाये, कारभारी सोसे ,आत्माराम महाराज शिंगणे ,तातेबा खार्डे तिकटे भाऊ पेढे वाले, राधाकिसन खार्डे रमेश खार्डे संतोष भुतेकर डॉक्टर शेषराव भुतेकर ,अंबुसकर नाना, भगवान खार्डे भीमराव चाटे माजी सैनिक श्रीधर मांटे मा सैनिक शिवराम मांटे मा सैनिक नंदा डोईफोडे मा सैनिक शिवाजी जाधव ज्ञानदेव माऊली आदी भक्तांनी गुरुपौर्णिमा कार्यक्रमास सहभाग घेतला . सोळा पक्वान्नाच्या प्रसादाने येथेच भोजन करून गुरु पौर्णिमा कार्यक्रमाची सांगता झाली. वैकुंठवासी ब्रह्मचारी सद्गुरु रामचरण दास महाराज . कर्नाटक मधील कांचनकोटी घराण्यातील तेजस्वी बाळ ते मरेपर्यंत दगडवाडी मेहुणा राजा देऊळगाव राजा उंबरखेड ,पांगरी , आळंद, टाकरखेड, देऊळगाव मही, लिंगा, देवखेड दुसर बीड किनगाव राजा या पन्नास कोसातील भक्तजनांना आजन्म ब्रह्मचारी राहून भक्तांचे कल्याण केले. ज्यांनी त्यांना त्रास दिला असेल त्यांचेही निश्चितच विपरीत कल्याण झाले.
जो माझे खाईल तो माझ्यासारखाच होईल हे बाबांचे सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखे शब्द आहे. सद्गुरु बाबा गेले परंतु त्यांचा हा शब्द नीतीवाण भक्त जपत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर डोंगरात पानपोहीच्या स्वरूपात तुन सुरू केलेल्या सेवेतून आज रोजी लाखो करोड रुपयांचे हे देवस्थान झाले. तळागाळातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांची सेवा घडावी हा बाबांचा भव्य हेतू . दुर्बल पीडित गरजू लोकांना पैसे देताना बाबांनी कधीच मोजले नाहीत तुझ्याजवळ आले तेव्हा परत कर इच्छा झाली तेव्हा परत कर, बाबांचं भव्य दिव्य मंदिर येथे उभारलं समाधी मंदिर ध्यान मंदिर मूर्ती स्थापन करावयाचे काम थांबले, कर्नाटक मध्ये जन्मलेल्या कांचनकोटी घराण्यातील तेजस्वी बाबांनी आपलं उभं आयुष्य या पंचक्रोशीतील सर्व
समाजाच्या लोकांच्या सेवेची घातलं तेच लोक आज स्वार्थ संस्थान कडे लाखो रुपये पडलेले असताना सुद्धा समितीच्या पदाच्या वाटाघाटा साठी वर्गणी करून कोर्टामध्ये दावा दाखल करत आहे ही खेदाची बाब आहे. तसे मंदिरावर कार्यक्रम करताना कोणताही वाद किंवा खालीवर बोलणे एकमेकास होत नाही सर्व जयंती पुण्यतिथी हनुमान जयंती रामनवमी गणेश जयंती सर्व चतुर्थ्या चे कार्यक्रम पार पडतात परंतु चारिटी कमिशनर बुलढाणा कडून मिटवून घेण्यासाठी सांगितलेले आहे तोपर्यंत दानपेटींचे सील उघडले जाणार नाही व सीज केलेले खाते वितळणार नाही प्रत्येक भक्ताने एक पाऊल पाठीमागे घेऊन सकारात्मक विचार करण्याची तयारी असेल तर ही सद्गुरूंच्या चरणी खरी श्रद्धांजली व गुरुपौर्णिमा असेल असे प्रत्येक भक्तांनी एकमेकाजवळ विषय मांडला जय हरी