जनावरांच्या गोठ्यामध्ये घुसले वाघोबा

जनावरांच्या गोठ्यामध्ये घुसले वाघोबा

वनविभाग अजूनही सुस्तीत गावकऱ्यात भीतीचे वातावरण


जिल्हा संपादक चंद्रपूर

गणेश उराडे ८९२८८६००५८


चंद्रपूर :- वरोरा तालुक्यातील  चारगाव बु येथील शेतकरी संजय पुंडलिक लाखे यांच्या जनावरांच्या गोठ्यात वाघ बसलेला आहे. असे गावकऱ्याच्या लक्षात आले     दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊस सुरू असताना जुन्या वस्ती कडून वाघ धावत येत असल्याचे गावकऱ्यांना आढळून आले गावकर यांनी त्याचा पाठलाग केला असता तो  धावत सरळ संजय लाखे यांच्या  जनावरांच्या गोठ्यामध्ये उडी मारून  आत शिरला व जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्याच्या ढिगावर वर जाऊन बसला वाघाला बघण्यासाठी  गावकर्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार मेश्राम सहकारी जाधव सरोदे व इतर कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात परिश्रम घ्यावे लागले वृत्त लिहीपर्यंत वाघाला पकडण्यात अथवा हाकलण्यात आले नव्हते वनविभागाचे कर्मचारी अजूनही तीन तास उलटूनही घटनास्थळी हजर झालेले नव्हते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler