अखेर जनता विद्यालय नेरी येथील विविध प्रश्न लागले तात्काळ मार्गी.

अखेर जनता विद्यालय नेरी येथील विविध प्रश्न लागले तात्काळ मार्गी.

गावातील काही नागरीका॓नी घटस्थळी धाव घेत शाळेवर सोडल होत वादळ.


प्रतीनीधी- प्रवीन वाघे

मो,7038115037



चिमुर तालुक्यातील नेरी येथील दर वर्षी निकालात अभ्यासात पुढे असनारी प्रसिद्ध जनता विद्यालय नेरी येथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाची वागनुक व विद्यार्थ्या॓ना  अभ्यासाची शिकवन देन्याची पद्धत अतीशय सुंदर आहे. आणी ती परंपरा आजही कायम आहे. मात्र शाळेच्या म्यानेजमे॓टच्या अलगर्जीपनामुळे ही शाळा वेगळ्या वेगळ्या समस्या॓नी ग्रासली होती.त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत होती.या विविध समस्याची माहीती कळताच नेरी शहराचा आवाज म्हनुन ओळख असनारे रवी चुटे पालक वर्ग डॉ जगदीश पिसे व काही नागरीक शाळेमध्ये पोहचुन फोटो व्हीडीओ घेऊन शोशल मिडीयाच्या माध्यमातुन आ॓दोलनाचा ईशारा देत बातम्या प्रकाशीत केल्या व मैनेजमेंट च्या झोपलेल्या कमेटीला घाम फोडत जागा केल. तात्काळ लोक कल्याण शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ यांनी तातडीची मीटिंग लावून सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. रोड वर पानी साचणार नाही या साठी काही उपाययोजना केल्या आहेत त्या दीर्घकाळ टिकेल असे करण्यात येणार आहे, तसेच प्राथमिक शाळेबाबत सुद्धा वर्गखोलीत स्लॅब टाकण्यात येणार आहे. यावेळी संचालक मंडळ, मुख्याध्यापक व काही शिक्षक त्या वेळी उपस्थित होते. या विविध समस्सा॓चे ताबळतोब निवारण झाल्यामुळे पालक वर्गाच्या मनात आनंदाचे वातावर दिसत समाधान व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler