लोणार तालुक्यातील काकड चिखला येथील माजी सैनिकाची वहिवाटी शेती रस्ता अडवल्यामुळे पेरणीपासून वंचित.

 

 

 लोणार तालुक्यातील काकड चिखला येथील माजी सैनिकाची वहिवाटी शेती रस्ता अडवल्यामुळे पेरणीपासून वंचित.






भिमराव चाटे तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा.

बीबी चिखला डांबरीकरण रोडला लागूनच  हाकेच्या अंतरावर माजी सैनिक रंगनाथ राघोजी वाघ यांची 199 गट मध्ये शेती आहे पूर्वीपासून चालत आलेला वहिवाटी मालकी हक्काचा रस्ता गट नंबर 197  198 मधून व इतर गटामधून त्यांना सात शेतकऱ्यांच्या शेताला लागून असलेल्या वहिवाटी रस्त्याने बैलगाडी ट्रॅक्टर पेरणी यंत्र घेऊन जावे लागते व माजी सैनिकांच्या शेतातून सुद्धा समोर दहा-पंधरा शेतकरी याच शेत रस्त्याचा वापर करतात रस्त्याला लागूनच मुरलीधर मुंढे, प्रल्हाद मुंढे ,प्रभू नारायण मुंढे ,श्रीराम नारायण मुंढे दत्ता हरिभाऊ  घीरके ,भगवान हरिभाऊ घीरके ,भुजंग गणपत घोडके यांच्या अनुक्रमे जमिनी आहेत परंतु दत्ता हरिभाऊ  घीरके यांनी शेत रस्त्याला दगड व काटे लावून बंद केले आहे परिणामी माजी सैनिकाची शेत पेरणी पासून वंचित आहे. प्रत्येकाला रस्ता हवा आहे उन्हाळ्यामध्ये जेसीबीच्या साह्याने शेतातील मोठ-मोठाले दगड धोंडे रस्त्यावर आणून टाकायचे आणि पाऊस आल्यानंतर परेशान व्हायचे असे सर्रास या डोंगराळ भागात होत आहे .

 रस्ता व्हावा अशी प्रत्येकाची ओरड आहे पाच पाच फूट दोन्ही बाजूकडून घ्या असं प्रत्येक जण म्हणतो परंतु धुर्‍यावर गाडीरस्त्यावर वाढलेली झाडे काढल्याशिवाय मोकळा रस्ता होत नाही, म्हणून सदर शेती मालकाने वहिवाटीचा रस्ता अडवला असून मला पेरणी साठी रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी तहसीलदार साहेब लोणार ,सैनिक संघटना व जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड यांच्याकडे  अर्ज केलेला आहे .


 अमृत जवान योजनेअंतर्गत आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली ठाणेदार साहेब गटविकास अधिकारी मंडळाधिकारी व काही माजी सैनिक यांची तक्रार निवारण समिती प्रत्येक तालुक्यामध्ये बनवलेली आहे त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी सैनिक परिवाराची मागणी आहे .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler