मेरा बु ते मेरा खुर्द शिवारातील . खडकपूर्णा विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे



  मेरा बु ते मेरा खुर्द  शिवारातील . खडकपूर्णा विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे

. खडकपूर्णा पाटावरचे रस्ते चिखलात की चिखलात रस्ते . 

. शेतकरी वर्गांची दयनीय अवस्था . 






  मयुर मोरे बुलढाणा जिल्हा सहसंपादक 

मेरा बु.ता. चिखली : -  गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरवात झाल्याने मेरा बु ते मेरा खुर्द शिवारातील खडकपूर्णा पाटावरचे रस्ते चिखलात की चिखलात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जातांना येतांना फार मोठा त्रास सहन करावा लावत आहे . 

  दे राजा खडकपूर्णा विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे दे मही खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाटाची कामे ठेकेदारासोबत हातमिळवणी करून अधिकारी वर्गांनी निकृष्ट दर्जाचे केल्या गेले आहेत त्यामध्ये मेरा बु ते मेरा खुर्द शिवारात ठेकेदारा मार्फत खडकपूर्णा पाटाचे खोदकाम काही ठिकाणी शेतात पूर्ण तर काही शेतात अर्धवट खोदकाम करण्यात आले तसेच पाटावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे करून टाकले आहे .या पाटावर एका बाजूने वाहने जाणे येण्यासाठी रस्ता बनविला असल्याने शेतकरी वर्गांना आप आपल्या शेतात बैलगाडी किंवा लहान वाहने घेवून मालाची वाहतूक करणे सोपे झाले होते  . परंतू ठेकेदाराने तयार केलेल्या पाटावरील रस्त्यावर कडक मरूम अथवा डब्बर टाकून पक्का रस्ता केला नाही . त्यामुळे शेतकरी वर्गांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी , पाटबंधारे विभाग , खडकपूर्णा विभाग यांच्याकडे तक्रारी करून न्याय मागितला तसेच पाटावर बसून आमरण उपोषण, तसेच पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे तक्रार केली होती . मात्र अधिकारी वर्गांनी आमरण उपोषण सोडण्यासाठी शेतकऱ्यांना काम करण्याचे लेखी आश्वासन दिले होते तसेच पालकमंत्री यांना काम सात दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेले आश्वासन आजपर्यंत कागदोपत्रीच आहे . त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने खडकपूर्णा पाटावरील रस्त्यावरील रस्त्यावर चिखल होवून वाहने फसत आहेत तर पावसाचे पाणी शेतात जावून पिकाचे व जमिनीचे अतोनात नुकसान होत आहे . पाटावरील रस्ता चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना खत बियाणे , शेती औजारे डोक्यावर वाहतूक करावी लागत आहे . तर पावसाचे पाणी एकमेकांच्या शेतात जावून शेताचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना वादांना सामोरे जावे लागत आहे .  तरी संबंधित वरीष्ठ अधिकारी वर्गांनी तात्काळ मेरा बु ते मेरा खुर्द खडकपूर्णा पाटाची पाहणी करुण पाटावरील रस्ते , पाटाची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करावी , शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा मोबदला द्यावा अशी मागणी जि.प. च्या महिला व बाल कल्याण सभापती सौ ज्योतीताई पडघान , माजी सभापती विनायकराव पडघान , कृषी माजी सभापती अशोकराव पडघान , प.स.सदस्य सत्तार पटेल ,  राष्ट्रवादी ता अध्यक्ष गजानन वायाळ ,राम खेडेकर,मनोज खेडेकर ,  उपसरपंच दिनकरराव डोगरदिवे ,  सरपंच सचिन खेडेकर , माजी सरपंच सौ अर्चना सुनील पडघान , विजू पाटील ,  निखिल पडघान , तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पडघान , पो पा बद्रीप्रसाद पडघान ,  , एकनाथ माळेकर , आदी शेतकऱ्यांनी केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler