वरोरा चिमूर मार्ग पूर्णपणे बंद

वरोरा चिमूर मार्ग पूर्णपणे बंद

 

जिल्हा संपादक चंद्रपूर

गणेश उराडे ८९२८८६००५८



गेल्या ५ वर्षा पासून वरोरा चिमूर मार्गाचे काम एस.आर.के कंपनी करत आहे हा रोड ५० km असून आज पर्यंत कंपनीच्या निष्काळजीपणा मुळे हा मार्ग आज पर्यंत पूर्ण झालेला नाही संत गतीने काम करत असल्यामुळे वारंवार वरोरा चिमूर रोड बंद होत  राहतात पुलाचे काम पूर्ण न केल्यामुळे आधीच बामण नाल्याचे वेळेवर पूर्ण न केल्यामुळे पावसामुळे तयार केलेला रस्ता वाहून गेला त्यामुळे मागील पाच दिवसांपासून वरोरा शेगाव मार्गाची वाहतूक ठप्प झाल्यामुळे पर्यायाने खेमजई टेमुरडा मार्गे वळविण्यात आली होती परंतु सदर मार्गसुद्धा पावसामुळे वारंवार बंद होत असल्यामुळे आज झालेल्या पावसामुळे हा मार्ग सुद्धा पूर्णपणे बंद झालेला आहे त्यामुळे एस आर के कंपनीच्या निष्काळजीपणामुळे महामार्ग वारंवार बंद होत असल्यामुळे कंपनीने लवकरात लवकर पुलाचे काम करावे व जे पूल मागील एक वर्षापासून पूर्ण होऊन सुद्धा सुरू केलेले नाहीत अशा त्वरित सुरू करून महामार्गाची वाहतूक व्यवस्थित करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे तसेच स्थानिक शेगाव मध्ये रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे चार महिन्यापासून येथेसुद्धा एक बाजू रोड तयार केला तरी तो अजून पर्यंत वाहतूकीसाठी सुरू केलेला नाही आणि दुसऱ्या बाजूचे कामाला अजून पर्यंत कुठलेही हात लावण्यात आला नाही तसेच शेगाव येथील स्थानिक लीडर याकडे कुठली लक्ष देत नाही शेगाव मधील काही चिरीमिरी खाऊन गप्प बसण्याची चर्चा शेगाव येथील गावकऱ्यांमध्ये आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler